Cabinet Expansion: मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे गटातील आमदारांचे शर्थीचे प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या दालनात रंगली चाय पे चर्चा

चहापाणाच्या कार्यकर्मात पुन्हा अकदा आमदार शहाजी बापू पाटलांचा किस्सा रंगला. काय झाडी, काय डोंगर, काय हाटीलवर एकच हशा पिकल्याचेही सांगण्यात येते आहे. गप्पा-मस्करी झाली असली तरी सगळ्या आमदारांचा अंतस्थ हेतू हा मंत्रिमंडळात कशी वर्णी लागेल, याबाबतच होता असे सांगण्यात येते आहे.

Cabinet Expansion: मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे गटातील आमदारांचे शर्थीचे प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या दालनात रंगली चाय पे चर्चा
मंत्रिपदासाठी आमदारांचे प्रयत्न Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 2:53 PM

मुंबई – दिल्ली दौऱ्याहून परतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde)यांच्या मंत्रालयातील दालनात (Cabin)आज शिंदे समर्थक आमदारांची गर्दी पाहायला मिळाली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion)येत्या ३ ते ४ दिवसांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, अशा चर्चा सुरु आहेत. तारखेची घोषणा झाली नसली तरी दिल्ली भेटीत भाजपा पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. अशा स्थितीत शिंदे गटातून किती जणांना मंत्रिमंदाची लॉटरी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सगळेच आमदार यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दालनात आज शिंदे गटातील आमदारांची चाय पे चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत पुन्हा एकदा बंड केले त्यावेळच्या घटनांना उजाळा मिळालाय. चहापाणाच्या कार्यकर्मात पुन्हा अकदा आमदार शहाजी बापू पाटलांचा किस्सा रंगला. काय झाडी, काय डोंगर, काय हाटीलवर एकच हशा पिकल्याचेही सांगण्यात येते आहे. गप्पा-मस्करी झाली असली तरी सगळ्या आमदारांचा अंतस्थ हेतू हा मंत्रिमंडळात कशी वर्णी लागेल, याबाबतच होता असे सांगण्यात येते आहे.

काय असेल मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला?

एकनाथ शिंदे गट आणि भाजपात मंत्रिमंडळाचे वाटप कसे होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भाजपाचे २७ आमदार तर शिंदे गटाकडून १३ ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, नगरविकास ही महत्त्वाची खाती कुणाकडे जातील याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. नगरविकासमधील एमएसआरडीसी विभाग मुख्यमंत्री स्वताकडे ठेवतील असे सांगण्यात येते आहे. ३० जूनला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता २३ दिवस उलटले तरी अद्याप विस्तार झालेला नाही. त्यामुळे सगळ्यांचीच उत्कंठा ताणली गेलेली आहे. विरोधकही दोन जणांचे मंत्रिमंडळ म्हणून सातत्याने सरकारविरोधात टीका करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे भाजपाची प्रदेश कार्यकारिणी सुरु

एकीकडे एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे मुख्यमंत्र्यांच्या दालनात एकत्रीकरण सुरु असताना दुसरीकडे प्रदेश भाजपाची कार्यकारिणीची बैठक पनवेलमध्ये सुरु आहे. भाजपाचे राज्यातील आणि केंद्रातील दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. पक्षबांधणी, आगामी महापालिका निवडणुका, सत्तेत आल्यानंतर जनतेची कामे, ध्येय धोरणे याबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येते आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुंबईमहापालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न असणार आहे, त्यानिमित्ताने आत्तापासूनच निवडणुकांच्या तायरीची रचना सुरु करण्यात आली आहे. त्याबाबतही आजच्या बैठकीत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.