डोंबिवलीतील स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू, कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक
गुरुवारी डोंबिवलीतील अमुदान केमीकल्स या कंपनीमध्ये अचानक स्फोट झाल्याने आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. या प्रकरणात आता पोलिसांनी कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक केली आहे.
डोंबिवलीतील स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली आहे. आठही मृतदेहाचीच डीएनए चाचणी केली जाणार आहे. डीएनए चाचणी द्वारे ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान डोंबिवली केमिकल रिएक्टर स्फोट प्रकरणी अमुदान केमिकल्स कम्पणीच्या मालकांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केलीये. मलया मेहता असं मालकाचे नाव असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास आता ठाणे गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान मेहता यांची आई मालती मेहता यांनाही आज नाशिक इथून अटक करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसी हद्दीतील अमुदान केमीकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये गुरुवारी अचानक स्फोट झाल्याने त्यात आतापर्यंत ८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ६४ जण जखमी झाले आहेत. प्रदीप मेहता वय ३८ वर्षे यास गुन्हे शाखेने आधीच ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना देखील गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांना नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची आता चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांच्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटानंतर आग लागली होती. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलांचे जवान दाखल झाले होते. ढिगाऱ्याखालून लोकांना काढण्यात आले. या प्रकरणात मालती मेहता या मुख्य आरोपी आहेत. मालती मेहता हे अमुदान कंपनीचे मालक आहेत.
अशा कंपन्या शहराबाहेर हव्यात – आठवले
केमिकल कंपन्या लोकांना धोका नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी अशा घातक कंपन्या स्थलांतरित करण्याचे मान्य केलंय. उद्योग मंत्रालयाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडलं आहे.