सोमय्यांसोबत खडसेंचं ये दोस्ती नहीं तोडेंगे, तर फडणवीसांना दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे…
आपल्या महाराष्ट्राला एक मोठी राजकीय संस्कृती आहे. राजकीय आखाड्यात एकमेकांवर चिकलफेक करणारे नेते बिगर राजकीय कार्यक्रमात मांडीला मांडी लावून जेवताना, एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. असेच काहीसे पुन्हा घडली आहे.
मुंबई : राज्यात सध्या विविध मुद्द्याावरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील आंदोलन, किरीट समय्या आणि संजय राऊत यांच्यातले आरोप, मसनची मशीदीचा भोंग विरुद्ध हनुमाना चालीसा, असे अनेक मुद्दे राज्याच्या राजकारणात सध्या गाजत आहे. यावरून टीका तर सोडचा पण नेत्यांमध्ये चक्क शिवीगाळा सुरू आहे. मात्र आपल्या महाराष्ट्राला एक मोठी राजकीय संस्कृती आहे. राजकीय आखाड्यात एकमेकांवर चिकलफेक करणारे नेते बिगर राजकीय कार्यक्रमात मांडीला मांडी लावून जेवताना, एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. असेच काहीसे पुन्हा घडली आहे. एका वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे जुने सहकारी आणि दोस्त एकत्र आले. त्यानंतर मात्र कार्यक्रमही बघण्यासारखाच रंगला.
सोमय्यांसाबोत खडसेंनी गायली गाणी
या कार्यक्रमात एकाथ खडसे आणि किरीट सोमय्या या दोघांच्या दोस्तीबद्दल सांगताना एकत्र ये दोस्ती हम नहीं तोडेंग गाणं गाताना दिसून आले. तर किरीट सोमय्या यांना खडसे यावेळी सल्ले देतानाही दिसून आले. मी सोमय्यांना नेहमी जपून राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देत असतो, असे यावेळी खडसे म्हणाले. मला त्यांना सल्ला द्याचा अधिकार आहे. ते कधी जात्यात असतात तर कधी सुपात असता, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी, असे खडसे म्हणाले. तसेच आमची दोस्ती ही पस्तीस वर्षांची आहे, असेही खडसेंनी आवर्जून सांगितले. दीड वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच व्यासपीठावर भेटलो, असेही त्यांनी सांगितलं.
फडणवीसांना खडसेंकडून पुन्हा चिमटा
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांबाबात मात्र खडसेंचा सूर राजकीय आखाड्यात असतो तसाच दिसून आला. कारण देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवल्यावर खडसेंनी चक्क..दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे, दोस्त ने जिंदगीभर के लिये बदनाम किया रे, असे म्हणताच हशा पिकला. तर सोमय्यांनी फडणवीसांवर गाणं म्हणायलाच नकार दिला. त्यानंतर खडसेंना संजय राऊतांचा फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी आ देखे जरा किसमे कितना है दम…हे गाणं गाताना दिसून आले. तर संजय राऊतांचा फोटो पाहताच सोमय्या म्हणाले मी साफ सफाईला सुरूवात केली आहे. यावेळी खडसेंनी जे ग्राऊंड लेव्हला काम केलं त्याला सोमय्या हे सलाम करताना दिसून आले. तसेच भाजपच्या मोठे होण्यात खडसेंचा मोठा वाटा आहे, असेही सोमय्या म्हणाले.
पाहा झी मराठीच्या कार्यक्रमातील खास झलक
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान
एका क्षणात पवारांनी सत्तेचे चित्र पालटले; मी पुन्हा येईल म्हणणारे पहात बसले; खडसेंचा फडणवीसांना टोला