फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे

यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली. ते जळगावच्या मुक्ताईनगर इथं बोलत होते.

फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 11:41 AM

जळगाव : फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) घणाघाती टीका केली आहे. आता फक्त दोनच पक्ष राहिले. यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली. ते जळगावच्या (Jalgaon) मुक्ताईनगर इथं बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. (Eknath khadse criticized on bjp and Devendra fadnavis in Jalgaon)

‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

खडसेंचा फडणवीसांवर घणाघात ज्या ताटात खातात त्याच थाटात शेंद करणारा मी नाही. तर शेतामध्ये काय उगवतं तर टरबूज असा नाव न घेता खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं. त्यामुळे यंदा भाजपचं सरकार हे कोणामुळे आलं नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अशी थेट टीक करत चाळीस वर्षात एकही आरोप माझ्यावर नव्हते. पण या दीड वर्षात बाईपासून ते विनयभंगांपर्यंत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. असं काय झालं नाथाभाऊचं अजूनपर्यंत याचं उत्तर मला मिळालेले नाही असंही खडसे म्हणाले.

भाजपला इशारा भाजपला मी आता करून दाखवतो असा थेट इशारा यावेळी खडसेंनी दिला. यावेळी बोलताना खडसेंनी भाजपचं सरकार यापुढे येणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. माझ्याजवळ आमदार नाही, खासदार नाही पण तरीसुद्धा माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहे आणि हे मी भाजपला दाखवून देणार आहे असा थेट इशारा यावेळी खडसेंनी दिला.

इतर बातम्या – 

मराठा क्रांती मशाल मार्चची नियमावली, शांततेत मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअर तरुणाने केलं मुलाचं अपहरण, घाबरला अन् असा घावला पोलिसांच्या ताब्यात

(Eknath khadse criticized on bjp and Devendra fadnavis in Jalgaon)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.