Eknath Khadse: राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचं षडयंत्र; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

Eknath Khadse: सर्वसामान्य माणूस बेरोजगार झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse: राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचं षडयंत्र; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 6:48 PM

जळगाव: राज्यात सत्ता नसल्यामुळे भाजपचे (bjp) नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते आदळ आपट करत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याच्या बोंबा ते मारत आहेत. एक तर महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच भोंगे, हनुमान चालिसाचे (hanuman chalisa) मुद्दे काढून विरोधकांकडून लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. विरोधककांकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्या अशा बोंबा ठोकायच्या आणि राज्यपालांना भेटायचे हेच काम विरोधकांना उरलं आहे. विरोधक राज्यपालांना वारंवार भेटून एक षड्यंत्र सुरू आहे. पण राष्ट्रपती राजवट लावण्याचं हे षड्यंत्र यशस्वी होणार नाही, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.

एकनाथ खडसे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. विरोधकांनी केंद्र सरकारकडे महागाईला दिलासा कसा मिळेल यासाठी मागणी करावी. महागाईने राज्यात उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणूस बेरोजगार झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारची भूमिका गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विषयी कठोर आहे. शासनाचे काम गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठीचं आहे. अशा स्वरूपाची कृती शासनाकडून अपेक्षित असते. महाविकासआघाडी सरकार या दृष्टीने आता पाऊल उचलत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले?

भाजप नेते आशिष शेलार यांच्या युतीच्या दाव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती होणार होती. त्यास शिवसेनेने विरोध केला होता असा शेलार यांनी गौप्यस्फोट केला आहे. यावर खडसे यांनी अंदर की बात सांगितली. 2014 मध्ये भाजप शिवसेना वेगळी लढली. मात्र 2019 मध्ये मात्र भाजप-शिवसेना एकत्रित लढली होती. जर 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीला शिवसेनेकडून विरोध होता तर मग 2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. मूळात अशिष शेलार सांगताहेत ते अर्धसत्य असून 2019 मध्ये झालेल्या भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणुकीत अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याच वेळी जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हे ठरलं असतं तर मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे युती तुटली नसती, असं खडसे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.