माझ्याच आदेशाने पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश; खडसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या आदेशानेच झाला आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

माझ्याच आदेशाने पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश; खडसेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 7:00 PM

जळगाव :  माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या आदेशानेच झाला आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Eknath Khadse on Udaysinh Padvi Join NCp)

माझ्या सल्ल्यानेच पाडवींनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हे खरंय. उदयसिंह पाडवी यांनी मला कोणत्या पक्षात प्रवेश करु असं विचारला होतं. त्यावर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असा सल्ला मी त्यांना दिला, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसंच अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा दिला आहे.

खानदेशातील अनेक नेते आमदार आपल्या सोबत आहेत. मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत का?, या प्रश्नावर ‘मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर मी त्यांच्या प्रवेशावर काय बोलू’, असं खडसे म्हणाले. तसंच मी आणखी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, असंही सांगायला खडसे विसरले नाही.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यातच आता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने आणि खडसेंनी देखील त्याला दुजोरा दिल्याने खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”. एकनाथ खडसेंनी देखील आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केलं आहे. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.

उदयसिंह पाडवी यांना खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितलेच आहे पण आणखी किती नेत्यांना आणि आमदारांना खडसेंनी पक्षांतराचा सल्ला दिलाय, हे देखील औत्सुक्याचं आहे. याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उदयसिंह पाडवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाडवी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं.

खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले होते.

(Eknath Khadse on Udaysinh Padvi Join NCp)

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.