…आणि एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या गळ्यातील पुष्पहार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकला, नेमकं काय घडलं?

शिंदे-फडणवीसांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सेलिब्रेशन केलं.

...आणि एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या गळ्यातील पुष्पहार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकला, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 9:05 PM

नागपूर : राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडताना दिसतोय. राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. विशेष म्हणजे आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आणि शिंदे गटाची युती ही तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारवर भारी पडताना दिसतेय. भाजप हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. अर्थात मतमोजणी अद्याप सुरुच आहे. पण मतमोजणी जवळपास पूर्ण होत आली आहे आणि भाजपने सर्वाधिक जागांवर यश मिळवल्याचं चित्र आहे. या निकालादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल केलेल्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत एकनाथ शिंदे आपल्या गळ्यात टाकलेला हार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होताना दिसतोय.

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरुय. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस हा प्रचंड गाजला. कारण विरोधकांनी विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांनी NIT जमीन घोटाळा प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण शिंदे-फडणवीसांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या गळ्यातील पुष्पहार फडणवीसांच्या गळ्यात का टाकला?

विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिंदे-फडणवीसांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सेलिब्रेशन केलं.

सेलिब्रेशन दरम्यान भाजपच्या एका नेत्याने पुष्पहार पुढे केला. तो हार देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतला आणि एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोध करत फडणवीसांच्याच गळ्यात हार टाकण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांनी जबरदस्ती एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात हार टाकला.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळ्यातील हार काढला आणि जबरदस्ती देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यानंतर फडणवीसांनी गळ्यातून पुष्पहार काढला आणि मागे भाजप नेत्यांकडे दिला.

यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना पेडा भरवला.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.