Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? शिंदे आणि मोदींची दिल्लीत भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेली भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. शिंदे यांनी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? शिंदे आणि मोदींची दिल्लीत भेट
एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 4:49 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील झालं आहे. आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे. तो कार्यक्रमही पुढच्या दोन-चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामे हाती घेत आहेत. असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता हे दोन्ही नेते जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही. त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“खरं म्हणजे ही भेट कुठलीही राजकीय नव्हती. सदिच्छा भेट होती. सरकारने केलेल्या कामांची पोचपोवती महाराष्ट्राची जनता देईल. तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली म्हणून तशी सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली. मोदींनी सुद्धा सांगितलं की, महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण जसे आपल्या पाठिशी उभे होतो तसे यापुढे देखील पाठिशी आहोत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिज्जू यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होत होती. अडीच वर्षात आम्ही लोकाभिमुख सरकार काय असतं ते दाखवलं आणि लोकांनी आम्हाला मान्यता दिली. केंद्र सरकारचं आमच्यामागे पाठबळ उभं होतं. आता आमची नवीन इनिंग सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कसा होईल? याचा विचार करु. महाराष्ट्रात क्षमता आहे. केंद्रातील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सर्वांची भेट घेणार आहोत”, अशी देखील माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे वन नेशन वन इलेक्शनवर काय म्हणाले?

“सतत होणाऱ्या निवडणूकांमुळे विकास थांबला जातो. देशाची प्रगती होण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन होणं गरजेचं आहे. एनडीएची बैठक होती. त्यामुळे त्यांचे पूर्व नियोजीत कार्यक्रम होते. ते मीटिंगला आले नाही. एनडीए मजबूत आहे. आम्ही इंडिया अलायन्स प्रमाणे स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.