Maharashtra News Update Live : आजच्या महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स…

| Updated on: Nov 30, 2022 | 11:19 AM

दिवसभराचे महत्वाचे अपडेट्स, वाचा...

Maharashtra News Update Live : आजच्या महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स...
Maharashtra Latest Breaking News Live UpdatesImage Credit source: tv9 marathi

सध्या दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जातोय. सध्या सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आज लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) आहे. त्यामुळे घरोघरी आनंदाचं वातावरण आहे. तसंच ठिकठिकाणी दिवाळी पहाटेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात काही राजकीय घडामोडीही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर दिवसभराचे महत्वाचे अपडेट्स (Maharashtra News live Update) वाचा एका क्लिकवर..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Oct 2022 09:35 PM (IST)

    पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडलं दरोडेखोराला

    पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडलं दरोडेखोराला

    हातात पिस्तूल घेऊन दरोडेखोर घुसला होता एका बंगल्यात

    कलेक्टर पट्टा भागातील खळबळ जनक घटना

    बंगल्यातील 3 महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

    लोकांच्या मदतीने चोरट्याला करण्यात आले पोलिसांच्या हवाली

  • 24 Oct 2022 09:31 PM (IST)

    अंबरनाथमध्ये भंगाराच्या गोडाऊनला आग

    अंबरनाथमध्ये भंगाराच्या गोडाऊनला आग

    बुवापाडा परिसरातील भंगार गल्लीत लागली आग

    फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता

    अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

  • 24 Oct 2022 05:23 PM (IST)

    पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची गोळ्या घालून हत्या

    पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची गोळ्या घालून हत्या

    केनियातील नैरोबीमध्ये पोलिसांनीच घातल्या गोळ्या

    देशद्रोहाचा दाखल करण्यात आला होता गुन्हा

    पाकिस्तान, दुबई आणि नंतर नैरोबी असा प्रवास करुनही झाली हत्या

  • 24 Oct 2022 05:17 PM (IST)

    कुलगुरूंच्या राजीनाम्यावरून केरळमध्ये राजकारण तापलं

    राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा राजीनाम्याचा आदेश

    केरळमधल्या नऊ विद्यापीठांच्या कुलगुरूंना राजीनामा देण्याचा आदेश

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची राज्यपालांवर टीका

    राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्यादे – मुख्यमंत्री विजयन

    कुलगुरूंबाबत राज्यपालांनी दिलेला आदेश असंवैधानिक – मुख्यमंत्री विजयन यांची टीका

    राज्यपाल राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम

  • 24 Oct 2022 04:05 PM (IST)

    मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी शिर्डीत

    मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी शिर्डीत

    शिर्डी घेतलं साई बाबांच्या समाधीचं दर्शन

    दर्शनानंतर अनंत अंबानी यांनी दिलं 1.51 कोटी रुपायाचं दान

    अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त

    दिवाळीच्या मुहूर्तावर अनंतर अंबानी साईनगरी शिर्डीत दाखल

  • 24 Oct 2022 02:46 PM (IST)

    लातूरकरांची दिवाळी, एसटीच्या ताफ्यात 60 नवीन बसेस दाखल

    ऐन दिवाळीत लातूर जिल्ह्यात एसटीच्या ताफ्यात 60 नवीन बसेस दाखल

    लातूरच्या बस स्थानकात या नवीन बसेसची पूजा करून प्रवासी सेवेसाठी रुजू करण्यात आल्या

    लातूर आगाराच्या अनेक बसेस जुन्या झाल्या होत्या

    त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती

    लातूर आणि जिल्ह्यातल्या इतर आगारात अशा एकूण 60 एसटी बसेस पाठवण्यात आल्या आहेत

  • 24 Oct 2022 01:11 PM (IST)

    भंगार गोळा करणाऱ्या तिघांना बेदम मारहाण

    पुण्यात मावळमध्ये चोरीच्या आरोपावरून तीन भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आलीय

    लोखंडी सळई चोरल्याचा आरोप करून लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आलीय

    मात्र मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी कायदा हातात घेऊन मारहाण करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न विचारला जातोय

    यावर तळेगाव पोलीस काही कारवाई करणार का? हे पाहावं लागेल

  • 24 Oct 2022 12:42 PM (IST)

    पुणे : चोरीच्या आरोपावरुन भंगार गोळा करणाऱ्यांना पुण्यात मारहाण

    चोरीच्या आरोपावरुन भंगार गोळा करणाऱ्यांना पुण्यात मारहाण

    पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली मारहाणाची घटना

    मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओदेखील समोर

    लाकडी दांडक्यासह हाताने तिघांना बेदम मारहाण

    मारहाण प्रकरणी तळेगाव पोलीस काय कारवाई करणार, याकडे लक्ष

  • 24 Oct 2022 12:40 PM (IST)

    कल्याण : गुरुदेव हॉटेल समोर बसमध्ये गॅस गळती

    कल्याण गुरुदेव हॉटेल समोर बसमध्ये गॅस गळती

    भर रस्त्यात चालत्या बस मध्ये आवाज आल्याने खळबळ

    बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानमुळे थोडक्या मोठा अनर्थ टळला

    कल्याण अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल

  • 24 Oct 2022 10:42 AM (IST)

    ऐरोलीत दिवाळी पहाट कार्यक्रम जल्लोषात साजरी करण्यात आला

    दिवाळी पहाट निमित्ताने स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

    नाशिक ढोल वाजवत ही दिवाळी पहाट साजरा करण्यात आली

    ऐरोलीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यातर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलंय

  • 24 Oct 2022 10:17 AM (IST)

    आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मिटवणार

    रवी राणा व बच्चू कडू यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा फोन आल्याची माहिती

    दिवाळी झाल्यावर लवकरच बच्चू कडू, रवी राणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार

    गुवाहाटीला जाऊन बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा रवी राणा यांनी केला होता आरोप

    तर काल बदनामी केल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी रवी राणा यांची दिली होती पोलीस ठाण्यात तक्रार

  • 24 Oct 2022 10:16 AM (IST)

    परभणीमध्ये भरदिवसा घडला हत्येचा थरार

    परभणीमध्ये भरदिवसा घडला हत्येचा थरार

    कटरने गळा चिरुन मित्रानेच केली मित्राची हत्या

    संतोष आवटे यांचा गळा चिरुन हेमंत गंडले यांनी केली हत्या

    आर्थिक व्यवहारातून वाद होऊन हत्या केल्याची माहिती

    हत्येची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    परभणीच्या सेलू शहरात हत्येच्या घटनेनं खळबळ

    मित्राच्या हत्याप्रकरणी आरोपी हेमंत गंडले यास अटक

  • 24 Oct 2022 09:46 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलमध्ये दाखल

    शूर जवानांसोबत साजरी केली दिवाळी

    कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

    सलग 9 व्या वर्षी नरेंद्र मोदीची जवानांसोबत दिवाळी साजरी

    भारतीय लष्करातल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोदींची अनोखी दिवाळी

    modi

  • 24 Oct 2022 09:23 AM (IST)

    नरक चतुर्दशीच्या पाश्वभूमीवर रत्नागिरीच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आकर्षक

    गणपतीपुळ्याच्या मंदिर पहिल्यांदाच आकर्षक फुलांची सजावट

    गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात देखील समईच्या दिव्यांची रोषणाई देखणे रुप उजळले

  • 24 Oct 2022 09:21 AM (IST)

    मोठा अपघात, मालगाडीचे 20डबे रुळावरून घसरले

    अमरावती नजीकच्या मालखेड रेल्वे गावाजवळ कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वे गाडीचे 20 डबे घसरले

    रात्री 11 वाजताच्या सुमारास अपघात

    दिवाळसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशाना याचा फटका बसला आहे.

    रेल्वेचे डबे रुळावरून काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

    मार्ग सुरळीत करण्यासाठी 200 रेल्वेचे कर्मचारी

    अनेक रेल्वे रद्द- वाचा सविस्तर

  • 24 Oct 2022 09:03 AM (IST)

    कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर गर्दीने फुललं

    दिवाळीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर गर्दीने फुललं

    दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचा निमित्तानं अंबाबाई च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    सहकुटुंब भाविक देवीच्या दर्शनाला

Published On - Oct 24,2022 8:59 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.