उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येतील का? पाहा मुख्यमंत्र्यांची EXCLUSIVE मुलाखत

एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येतील का? पाहा मुख्यमंत्र्यांची EXCLUSIVE मुलाखत
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्रित येतील का? पाहा मुख्यमंत्र्यांची EXCLUSIVE मुलाखत
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 5:35 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “आमची विचारधारा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची विचारधारा, त्यांची वैचारिक भूमिका घेऊन आज आम्ही पुढे जात आहोत. आम्ही हा निर्णय का घेतला? आम्ही त्यांना सांगितलं की, आपण पुन्हा शिवसेना-भाजप युती करु. कारण शेवटी आपण शिवसेना-भाजप युती म्हणूल लढलो आणि सरकार कोणाबरोबर बोलावलं? तर काँग्रेस बरोबर. बाळासाहेबांना ते नको होतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“बाळासाहेब कधीही म्हणायचे की, शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं आणि सरकार बनवलं. ते सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन चाललं. शिवसेना खड्ड्यात घालायला गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधली. म्हणून आम्ही गेलो. आमची विचारधारा ही बाळासाहेबांची आणि विकासाची आहे. आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

ठाकरेंसोबत जाण्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत का?

यावेळी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र जाण्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. “कशासाठी? आम्ही राज्याच्या हितासाठी लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि रिझल्ट दिले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे ‘मातोश्री’ला गेले असं कधी होईल का?

एकनाथ शिंदे ‘मातोश्री’ला गेले असं कधी होईल का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “जर-तरला काय अर्थ आहे. वर्तमानमध्ये आम्ही जे काम करतोय, मला अभिमान आहे की, एवढ्या दोन वर्षात अनेक कामं केली. त्यांनी पायबंध केलेली प्रकल्प आम्ही सुरु केले. मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना आणल्या, याचा अभिमान आहे, समाधान आहे. लोकांची खुशी त्यात आमची खुशी आहे. लोकांचं समाधान त्यात आमचं समाधान असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.