‘उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही’, शिंदे गटाच्या वकिलांचा सर्वात मोठा युक्तीवाद

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी पक्षाची रचना काय हे निवडणूक आयोगात वाचून दाखवलं.

'उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही', शिंदे गटाच्या वकिलांचा सर्वात मोठा युक्तीवाद
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 6:02 PM

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडतेय. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद केला. विशेष म्हणजे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केला. यासाठी त्यांनी शिवसेनेची घटना वाचून दाखवली. या घटनेसोबत त्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत शिंदे गट कसा योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी पक्षाची रचना काय हे निवडणूक आयोगात वाचून दाखवलं.

शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत, असं जेठमलानी आपल्या युक्तीवादात म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा बोगसपणा आहे. त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला.

हे सांगताना जेठमलानी यांनी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणचा दाखलाही दिला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय-काय घडलं?

केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झालीय. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरुय तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलीय. ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब हे निवडणूक आयोगात उपस्थित आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुतणे वकील निहार ठाकरे हे उपस्थित आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु झाल्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असं सिब्बल यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद केला जाणार असेल तर तो युक्तीवाद हा प्राथमिक आहे की अंतिम आहे ते स्पष्ट करण्यात यावं, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.

कपिल सिब्बल आपली भूमिका मांडत असताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करण्यास सुरुवात केला. आज कुणीही अपत्रा ठरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण कुणाचं हे ठरवायला कोणताही अडथला नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला.

जेठमलानी यांनी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कारण शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, असं जेठमलामी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.

आमचा जर प्राथमिक युक्तीवाद फेटाळला तर आम्हाला तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल, असं म्हणत कपिल सिब्बल आणि जेठमलानी यांच्यातच झुंपलेली बघायला मिळाली.

आम्ही एकत्र ऑर्डर करु, असं निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्ट केलं.

शिंदे गटाकडे आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे, असा युक्तीवाद वकील महेश जेठमलानी यांनी केला. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गट योग्य असल्याचा युक्तीवाद वकील जेठमलानी यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगात शाखाप्रमुखांपासून, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. पण शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेले कागदपत्रे बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला.

‘उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद बेकायदेशीर’, शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा युक्तीवाद

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली.

शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत, असं जेठमलानी आपल्या युक्तीवादात म्हणाले.

बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा बोगसपणा आहे. त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला.

हे सांगताना जेठमलानी यांनी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणचा दाखलाही दिला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.

शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांच्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील मणिंदर सिंग यांनी युक्तीवाद सुरु केला. सिंग यांनीसुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीचा दाखला दिला गेला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.