Video | सभेला गर्दी झाली नाही, आयोजकांनी लढवली नामी शक्कल
Eknath Shinde: जळगाव शहरालगत खेडी शिवारात ५५ एकरांच्या भूखंडावर भव्य आणि सुसज्य जिल्हा वारकरी भवन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला तब्बल तीन ते चार तास उशीर झाल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली नाही. वारकरी कार्यक्रमाला आले नाही. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या.
किशोर पाटील, जळगाव | दि. 5 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगाव शहरातील राज्यातील पहिलेच असे वारकरी भवनाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून आयोजकांनी अनोखी शक्कल लढवण्याचा पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या होत्या त्या ठिकाणापासून मध्येच मंडप लावून त्या खुर्च्या दिसू नये या पद्धतीने झाकण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांना चार तास उशीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला तब्बल तीन ते चार तास उशीर झाल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली नाही. वारकरी कार्यक्रमाला आले नाही. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या, असे आयोजकांकडून सांगण्यात आलं. मात्र त्या रिकाम्या खुर्च्या दिसू नये म्हणून जगण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे मात्र यावेळी स्पष्टपणे दिसून आलं. खुर्च्या रिकाम्या खुर्च्या दिसू नये, असा मंडप टाकण्यात आल्यानंतर पलीकडच्या बाजूला नागरिकांना जेवण्याची व्यवस्था तसेच फूड पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात आल्याच आयोजकांकडून कार्यक्रमावेळी सांगण्यात येत होतं. मुख्यमंत्र्यांच या ठिकाणी भाषण होणार असतानाही खुर्च्या रिकाम्या दिसू नये म्हणून आयोजकांनी किंवा प्रशासनाने लढविलेल्या या अनोख्या शकलीची यावेळी एकच चर्चा होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी कमी झाली. मग दोन भाग करुन पडदा टाकला#Jalgaon #ShivsenaUBT pic.twitter.com/pSeM2bPt7O
— jitendra (@jitendrazavar) March 5, 2024
५५ एकरांच्या भूखंडावर भव्य भवन
जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या पहिल्या असलेल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन झाले. जळगाव शहरालगत खेडी शिवारात ५५ एकरांच्या भूखंडावर भव्य आणि सुसज्य जिल्हा वारकरी भवन होणार आहे. गुलाबराव पाटील यांनी तुम्ही अनेक विकास कामे केली असतील मात्र आज असे काम वारकऱ्यांच्या दृष्टीने आज महत्त्वाचं काम तुम्ही करत आहेत त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांचे कौतूक केले.
पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकीला लाखो लोक जातात. पंढरपूरची आषाढीला पूजन पूजा करण्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं. खऱ्या अर्थाने त्या पंढरपूर बरोबर इतर आज पंढरपूरचा विकास आपण करतोय. त्या ठिकाणी आपण आपलं जे काही काम आहे, ते सुरू केले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.