दिल्ली, मुंबईनंतर राजकीय हालचालींचे केंद्र दरेगाव, एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी माझा निर्णय घेतलायं’

Eknath Shine News: तुम्हाला गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदपद हवे आहे? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबत महायुतीत चर्चा होईल. त्यातून निर्णय होतील. जनतेने आमच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. आम्हाला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.

दिल्ली, मुंबईनंतर राजकीय हालचालींचे केंद्र दरेगाव, एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी माझा निर्णय घेतलायं'
Eknath Shinde
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 3:42 PM

Eknath Shine: राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी गेले आणि देशभरातील राजकारणात चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे म्हणतात प्रकृती बरी नसल्याने गावी आलो तर विरोधक एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा घडवत आहे. बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील राजकारणाचे केंद्र दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगाव झाले आहे. एकनाथ शिंदे दरेगावमध्ये असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच काम नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चा घडवून आणत असल्याचा टोला लगावला. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले.

जनतेचे प्रश्न सोडवले. अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा राज्यातील कोट्यवधी लोकांना मिळत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते. आम्हाला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर कोणताही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. त्यात माझी सर्व भूमिका स्पष्ट केली. मी माझा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

खात्यांवर चर्चा होणार

तुम्हाला गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदपद हवे आहे? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबत महायुतीत चर्चा होईल. त्यातून निर्णय होतील. जनतेने आमच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. आम्हाला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे विरोधक काय बोलताय? त्याकडे मी लक्ष देत नाही. मला माझी भूमिका परत परत मांडण्याची गरज नाही. त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळत नाही. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या चर्चा करत आहेत.

निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.