Eknath Shinde | मनोज जरांगे यांची हाक मुख्यमंत्री ऐकणार? उपोषण सोडवण्यासाठी स्वत: जाणार?

मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांना अंतरवली सराटी गावात बोलावलं आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde | मनोज जरांगे यांची हाक मुख्यमंत्री ऐकणार? उपोषण सोडवण्यासाठी स्वत: जाणार?
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 4:43 PM

जळगाव | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण उपोषण मागे घ्यायला तयार आहोत. पण उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती घराण्याचे सातारा गादीचे वंशज उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी यावे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षण लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याचबाबत एकमत झालं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. आपण उपोषण मागे घेतलं तरी उपोषणस्थळी आंदोलन सुरुच राहणार, असं जरांगे यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या पाच अटी

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारला पाच अटी ठेवल्या आहेत. सरकारने नेमलेल्या समितीची अहवाल काहीही आला तरी मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात यावं. तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत ते परत घ्यावे. लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं, उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी यावं. सरकारच्या वतीने सर्व लिहून दिले पाहिजे, अशा पाच प्रमुख अटी मनोज जरांगे यांनी ठेवल्या आहेत.

मनोज जरांगे यांच्या अटींवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्री आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या अटींवर प्रतिक्रिया दिली.

“मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी बोलतो. सरकार मराठा आरक्षणावर सरकारात्मक आहे. सर्वपक्षीय बैठकीत देखील मराठा आरक्षणावर चर्चा झालीय. मनोज जरांगे यांची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतो”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.