समीर वानखेडे, निरुपम, देवरा यांना तिकीट, एकनाथ शिंदे यांचा मुंबईत मोठा डाव
कॉंग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केलेली आहे. या तिसऱ्या यादीत 16 जणांना स्थान देण्यात आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मुंबईत कॉंग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांना उभे करण्याची योजना आखली आहे.
महायुतीच्या यादीचा घोळ सुरुच असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई धक्कातंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसच्या आजी-माजी नेत्यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कॉंग्रेसमधून आलेले संजय निरुपम, मिलिंद देवरा आणि समीर वानखेडे यांनी तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक रित्या समजते. दरम्यान कॉंग्रेसने आपल्या उमेदवाराची तिसरी यादी जाहीर केली असून यात 16 जणांना संधी दिलेली आहे. दिग्रज येथून ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. भांडुप विधानसभा येथून अशोक पाटील, विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुवर्णा करंजे, धारावी मतदार संघातून समीर वानखेडे, वरळी विधानसभा येथून मिलिंद देवरा आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांचे संभाव्य उमेदवार असणार आहेत.
Congress Third List
कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर
कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर झालेली आहे. केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून खालील सदस्यांची निवड केली आहे.वांद्रे पश्चिम येथून असिफ झकेरीया, अंधेरी पश्चिम येथून सचिन सावंत, दिग्रज येथून ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.
खामगाव – राणा दिलीप कुमार सानदा
मेळघाट -एससी – डॉ. हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोळी -एसटी – मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रज – माणिकराव ठाकरे
नांदेड द. – मोहनराव मानोतराव अंबाडे
देगलुर एससी – निवृत्तीराव कोंडीबा कांबळे
मुखेड – हनमंतराव पाटील
चंदवड – शिरिषकुमार वसंतराव कोटवाल
इगतपुरी एसटी – लखीभाऊ भिखा जाधव
भिवंडी प. – दयानंद मोतीराम चोरघे
अंधेरी प.- सचिन सावंत
वांद्रे प.- असिफ झकेरिया
तुळजापूर – कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर नॉर्थ – राजेश भारत लाटकर
सांगली – पृथ्वीराज गुलाबराव पाटील