Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाणाची पुढची सुनावणी आता 17 जानेवारीला, निवडणूक आयोगाच्या सुनावणीत नेमकं काय-काय घडलं? वाचा सविस्तर

निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. तर ठाकरे गटाला युक्तीवादासाठी 17 जानेवारीची तारीख घोषित केली. त्यामुळे आता सत्तासंघर्षावरील ही सुनावणी 17 जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली.

धनुष्यबाणाची पुढची सुनावणी आता 17 जानेवारीला, निवडणूक आयोगाच्या सुनावणीत नेमकं काय-काय घडलं? वाचा सविस्तर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 7:22 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तीवाद करायला सुरुवात केली. त्यांनी सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी घेऊ नये. किंवा निवडणूक आयोगातील सुनावणी ही प्राथमिक की अंतिम आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी सिब्बल यांनी केली. सिब्बल यांचा हा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपण सर्व ऑर्डर एकदाच देऊ, असं सिब्बल यांना स्पष्ट सांगितलं. त्यानंतर शिंदे गटाच्या दोन वकिलांनी अतिशय प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. तर ठाकरे गटाला युक्तीवादासाठी 17 जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता सत्तासंघर्षावरील ही सुनावणी 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.

निवडणूक आयोगात काय-काय घडलं?

केंद्रीय निवडणूक आयोगात आज दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरुय तोपर्यंत निवडणूक आयोगात सुनावणी नको, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब हे निवडणूक आयोगात उपस्थित होते. तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुतणे वकील निहार ठाकरे हे देखील उपस्थित आहेत.

ठाकरे गटाचा युक्तीवाद

केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु झाल्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असं सिब्बल यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाकडून युक्तीवाद केला जाणार असेल तर तो युक्तीवाद हा प्राथमिक आहे की अंतिम आहे ते स्पष्ट करण्यात यावं, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.

शिंदे गटाच्या वकिलांचं कपिल सिब्बल यांना उत्तर

कपिल सिब्बल आपली भूमिका मांडत असताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करण्यास सुरुवात केला. आज कुणीही अपत्रा ठरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण कुणाचं हे ठरवायला कोणताही अडथला नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला.

जेठमलानी यांनी कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. कारण शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, असं जेठमलामी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.

कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

आमचा जर प्राथमिक युक्तीवाद फेटाळला तर आम्हाला तशी ऑर्डर आयोगाने करावी म्हणजे आम्हाला अपील करता येईल, असं म्हणत कपिल सिब्बल आणि जेठमलानी यांच्यातच झुंपलेली बघायला मिळाली.

निवडणूक आयोगाची भूमिका

आम्ही एकत्र ऑर्डर करु, असं निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्ट केलं.

शिंगे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद

शिंदे गटाकडे आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे, असा युक्तीवाद वकील महेश जेठमलानी यांनी केला. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गट योग्य असल्याचा युक्तीवाद वकील जेठमलानी यांनी केला.

शिंदे गटाच्या कागदपत्रांवर ठाकरे गटाचा आक्षेप

केंद्रीय निवडणूक आयोगात शाखाप्रमुखांपासून, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. पण शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेले कागदपत्रे बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला.

‘उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद बेकायदेशीर’, शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा युक्तीवाद

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल माहिती दिली.यावेळी त्यांनी पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली.

शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत, असं जेठमलानी आपल्या युक्तीवादात म्हणाले.

बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा बोगसपणा आहे. त्यामुळे ते बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला.

हे सांगताना जेठमलानी यांनी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणचा दाखलाही दिला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.

शिंदे गटाच्या दुसऱ्या वकिलांचा युक्तीवाद

शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांच्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील मनिंदर सिंग यांनी युक्तीवाद सुरु केला. सिंग यांनीसुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीचा दाखला दिला गेला.

धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हे आधी ठरवावं असा युक्तीवाद मनिंदर सिंग यांनी केला. गरीब, अशिक्षितांना समजण्यासाठी धनुष्यबाणाचा निर्णय महत्त्वाचा, असं वकील मनिंदर सिंग आपल्या युक्तीवादात म्हणाले.

मानिंदर सिंग यांच्याकडून सादिर अली केसचा दाखला यावेळी देण्यात आला. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळायला हवं, असा युक्तीवाद वकील मानिंदर सिंग यांनी केला.

'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.