EC hearing on NCP Symbol | महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा निर्णय आज होणार? शरद पवार स्वत: सुनावणीला हजर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीला स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हजर आहेत. त्यामुळे या सुनावणीचं महत्त्व आणखी जास्त वाढलं आहे. या सुनावणीत निवडणूक आयोग काही मोठा निर्णय जाहीर करतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

EC hearing on NCP Symbol | महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा निर्णय आज होणार? शरद पवार स्वत: सुनावणीला हजर
ajit pawar sharad pawar ncp
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 5:35 PM

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या संबंधित याचिकेवर आज सुनावणी पार पडत आहे. या सुनाणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झाले आहेत. त्यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड सुनावणीसाठी हजर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे देखील निवडणूक आयोगात दाखल आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रतिज्ञा सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून एकूण 18 ते 20 जण आले आहेत. त्यामुळे आज निवडणूक आयोगाकडून मोठी काही घोषणा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याआधी अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी भूमिका मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यामुळे निवडणूक आयोग युक्तिवादासाठी वेळ वाढवून देते का? की शरद पवार यांच्या गटाचा युक्तिवाद आज सुरु होतो? याकडे राज्याचं लक्ष आहे. दोन्ही गटाचा आज युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग आज निकाल राखून ठेवून निकालाची तारीख जाहीर करतं का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवार गटाच्या वकिलांकडून युक्तिवादाला सुरुवात

गेल्या सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यामुळे सुनावणी सुरु झाल्यानंतर आज अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलीय. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाकडून सुरुवातीला दोन्ही गटाचा पूर्ण युक्तिवाद ऐकून घेतला जाईल. त्यामुळे आज शरद पवार गटाला युक्तिवादाची संधी देण्यात आलीय. गेल्या सुनावणीत अजित पवार गटाने बाजू मांडली होती. त्याला उत्तर म्हणून आज अभिषेक मनु सिघवी बाजू मांडत आहेत. शरद पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत आहेत.

अजित पवार गटाचे 2 हजार प्रतिज्ञापत्र खोटी, शरद पवार गटाचा दावा

अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. विशेष म्हणजे जमा केलेल्या शपथपत्रांमध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय. तसेच अजित पवार गटाची 2 हजार पेक्षाअधिक शपथपत्रे खोटी असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वकिलांनी केलाय. अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये काही मृत पदाधिकाऱ्यांचे देखील प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचं शरद पवार गटाच्या वकिलांनी सांगितलं. यावेळी त्या पदाधिकाऱ्यांचे नावं देखील जाहीर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आम्हाला शिवसेनेसारखी वागणूक नको, शरद पवार गटाच्या वकिलांची मागणी

शिवसेनेच्या सुनावणीवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र ग्राह्य न धरता निकाल देण्यात आल्याचं निदर्शनास आलंय, असं वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले आहेत. शिवसेनेसारखी वागणूक आम्हाला देण्यात येऊ नये. आमची प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात यावी, अशी विनंती अभिषेक मनु सिंघवी यांनी केली.

शरद पवारच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत शरद पवारांना अधिकार देण्यात आले, असं वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय. तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं पत्र देताना अजित पवार यांचंही अनुमोदन होतं, असंही अभिषेक मनु सिंघवी म्हणाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.