Nanded Election | नांदेड जिल्ह्यात 10 नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील दहा नगर परिषदांवर सध्या प्रशासकांची नेमणूक झाली आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात होईल. कोरोना संकटामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता ही प्रक्रिया सुरु झाल्याने इच्छुक उमेदवार नव्याने तयारीला लागणार आहेत.

Nanded Election | नांदेड जिल्ह्यात 10 नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी,  प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:36 PM

नांदेडः राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मंगळवारी एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व संपणाऱ्या 208 नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित केला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) दहा नगर पालिकांच्या निवडणुकांचा समावेश आहे. त्यामुळे येथील निवडणुकांच्या (Elections 2022) रणधुमाळीलाही लवकरच प्रारंभ होणार आहे. येथील 10 नगर परिषदांचा प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची तारीख 2 मार्च ही देण्यात आली आहे तर 7 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोग याला मान्यता देईल.

नांदेडमधील कोणत्या 10 नगर परिषदा?

नांदेड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमध्ये ही निवडणुक होईल. त्यांची नावं पुढील प्रमाणे- देगलूर, भोकर, हदगाव, धर्माबाद, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी.

यापैकी देगलूर नगर परिषदेची मुदत 17 फेब्रुवारी रोजी संपली. भोकर नगर परिषदेची मुदत 9 मे रोजी संपली. बिलोलीची 17 फेब्रुवारी तर हदगाव, धर्माबादची मुदत 29 डिसेंबर रोजी संपली. कंधार, कुंडलवाडी, मुदखेडी मुदत 17 फेब्रुवारी रोजी संपली. मुखेडची मुदत 21 फेब्रुवारी तर उमरी नगर परिषदेची मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. जिल्ह्यातील दहा नगर परिषदांवर सध्या प्रशासकांची नेमणूक झाली आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात होईल. कोरोना संकटामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता ही प्रक्रिया सुरु झाल्याने इच्छुक उमेदवार नव्याने तयारीला लागणार आहेत.

प्रभाग रचनेचा कार्यक्रम कसा?

– राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव 2 मार्चपर्यंत पाठवायचा आहे. – या प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला 7 मार्च पर्यंत राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल. – प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग नकाशे, रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवण्यासाठी 10 मार्च पर्यंत विविध माध्यमांद्वारे जनतेसाठी प्रसिद्ध केले जाणार आहेत. – त्यावर हरकती व सूचना 10 ते 17 मार्च या कालावधीत मागवल्या जातील. – सूचनांवर 22 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. – हरकती आणि सूचनांच्या सुनावणीनंतर 25 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी निवडणूक आयुक्तांकडे आपला अहवाल सादर करतील. – अंतिम प्रभाग रचनेस 1 एप्रिलपर्यंत मान्यता मिळणार आहे.

इतर बातम्या-

Video : लग्न आहे की सर्कस? क्वचितच पाहिलं असेल ‘असं’ भन्नाट Pre Wedding Photoshoot!

बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.