महापालिकेआधीच 14 बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचे जंगी सामने; नाशिक जिल्ह्यात मतदार याद्या प्रसिद्ध!
अखेर नाशिक महापालिका निवडणुकीच्या अगोदरच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, 14 बाजार समित्यांसाठी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
नाशिकः अखेर नाशिक महापालिका निवडणुकीच्या अगोदरच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, 14 बाजार समित्यांसाठी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. या बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलीय.
नाशिक जिल्ह्यातील 23 ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या 14 बाजार समित्यांची निवडणूक सहकार खात्याने जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातले राजकीय वातावरण तापले आहे. खरे तर कोरोनाच्या भयंकर लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीला यापूर्वी दोनवेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. मात्र, जिल्ह्यात त्यानंतरही अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण सापड होते. त्यामुळे त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांना मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून ज्या कृषी उत्पन्न बाजार समितींची मुदत संपली होती, त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे कळवले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरली. तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव, सुरगाणा या बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
22 पर्यंत हरकती नोंदवण्यास मुदत
ग्रामपंचायत, पंचायत समिती, सोसायटी, तालुका उपनिबंधक कार्यालयात प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 22 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 16 डिसेंबरपासून नामांकनास सुरुवात होईल. उमेदवारांना 7 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तर 17 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आता या निवडणुका सत्ताधारी महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाआघाडीचे काय?
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि बाजार समित्याच्या निवडणुका पक्षनिहाय होणे अवघड असते. या ठिकाठिकाणी छोटे-छोटे गट प्रबळ असतात. अनेकजण विधानसभा आणि लोकसभेसाठी एखाद्या पक्षासाठी काम करतात. मात्र, अशा ठिकाणी गट आणि तटावर भर असतो. हे पाहता या बाजार समित्यांची निवडणूक आता महाविकास आघाडीची मोट बांधून होणार की जुन्या पद्धतीने हे पाहावे लागेल. (Elections will be held in 14 market committees in Nashik district, draft voter lists published)
इतर बातम्याः
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव उद्यापासून सुरू
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021