प्रवाशांचे हाल होत आहेत; कामावर रुजू व्हा, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाकडून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांचे हाल होत आहेत; कामावर रुजू व्हा, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 11:15 AM

मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार – पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तसेच एसटी महामंडळाला दिवसाला 12 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने आता महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने एक जाहीर पत्रक काढण्यात आले  आहे. या पत्रकातून कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा एकदा रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे पत्रक?

महामंडळ 12 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात असताना देखील कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा पगार देण्यात आला आहे. यापुढे देखील सर्व वेतन वेळेत देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 28 टक्के तर घर भाडे 8 हजार रुपये मान्य करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. महामंडळाला देखील दिवसा काठी 12 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा परिणाम संस्था आणि कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ भोगावे लागतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, त्यांच्या इतर मागण्या देखील हळूहळू पूर्ण केल्या जातील असे आवाहन या पत्रकातून कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?

एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळतो, याच वेतनामध्ये त्यांना आपले घर चालवावे लागते. मागील काही महिन्यांपासून हे वेतनही वेळेवर मिळालेले नाही. कोरोना काळात त्यांच्या अतिरिक्त ड्युट्या लावण्यात आल्या होत्या, मात्र पगार मिळाला नाही. अशा विविध कारणांमुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. एसटी महामंंडळाचे शासकीय सेवेत विलगिकरण करावे आणि कर्मचाऱ्यांना क दर्जा देण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसोबतच वेतन वेळेवर मिळावे, महागाई भत्ता वाढावा अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या 

कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या; लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी, संजय राऊत भडकले

महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार; मुंबईत येताच नड्डांचा हुंकार

पिकांचे भाव माहित नाहीत; गांजा किती रुपयांना मिळतो हे बरोबर ठावूक असते, विखेंचा मलिकांवर निशाणा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.