Anil Parab ED Notice | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ED Notice) जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

Anil Parab ED Notice | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 7:48 PM

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ED Notice) जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे. (enforcement directorate ed issued notice to minister anil parab shivsena leader sanjay raut given information by tweet)

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

ईडीची नोटीस नेमकी कशासाठी ?

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला  सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

संजय राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले ?

” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

राणे कनेक्शनमुळे परबांना ईडी?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. याच मुद्द्याला घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शनं तसेच आंदोलनं केली जात होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य रंगलं. यामध्ये परब पोलिसांना सूचना देत असल्याचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला होता. परबांच्या या व्हिडीओच्या आधावरच भाजपने त्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. तसेच आम्ही या सर्व गोष्टींचा रितसर बदला घेऊ असं राणे बंधू यांनी सूचक विधान केलेलं होतं. या सर्व घडामोडीनंतर आता परब यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. नारायण राणे यांना अटक होण्यामागे परबांची मोठी भूमिका असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली नाही ना ? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

किरीट सोमय्या अनिल परब यांच्या मागे का लागले ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांना यापूर्वी लक्ष्य केलेलं आहे. त्यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत. सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच अनिल देशमुख 100 कोटी रुपये वसुली प्रकरण समोर आल्यानंतरही पुढचा नंबर हा अनिल परब यांचाच आहे, असे सोमय्या वेळोवेळी सांगत आलेले आहेत. तसेच परिवहन विभागातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या तसेच भाजपने केलेला आहे.

इतर बातम्या :

काल लालूंना भेटले, आज शरद यादवांना; भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी देशव्यापी लढा उभारणार?

पुण्यात ‘स्पेशल 26’ चा थरार, आयटी अधिकारी बनले, सराफाला उचललं, सोनं नाणंही हिसकावलं पण नेमकं कुठं बिघडलं? वाचा सविस्तर

राज्यात लवकरच मराठी भाषा विद्यापीठ, 10 दिवसांत समिती स्थापन करणार : उदय सामंत

enforcement directorate ed issued notice to minister anil parab shivsena leader sanjay raut given information by tweet

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.