अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात

ईडीने येत्या मंगळवारी म्हणजेच 31 ऑगस्टला पबर यांना ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्ही कशालाही घाबरत नाही. ही सगळी लढाई कायद्यानेच लढवली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत.

अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात
संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 7:52 PM

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ed notice) बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ईडीने येत्या मंगळवारी म्हणजेच 31 ऑगस्टला परब यांना ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. “आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्ही कशालाही घाबरत नाही. ही सगळी लढाई कायद्यानेच लढवली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत. (enforcement directorate ed issued notice to minister Anil Parab Shivsena leader Sanjay Raut said will fight this battle with help of law)

संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?   

“काल रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. जनआशीर्वाद यात्रा संपली आणि ताबडतोब या पालकमंत्र्यांना वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं. ईडीचं. येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे. आम्ही काय कुणाला धमक्या देणार नाही. आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं कायदेशीर लढाया लढतात आणि जे असत्य आहे, जे बनावट आहे त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचं बळ आहे. आम्ही बनावट नाही. तुम्ही हे सर्व आमच्यावर लादत आहात,” असं रोखठोक भाष्य राऊत यांनी केलंय.

खोटेनाटे आरोप केले तरी डगमगणार नाही

तसेच पुढे बोलताना कितीही चिखलफेक केली तरी आम्ही डगमगणार नाही, असं राऊत यांनी ठणकाऊन सांगितलंय. “असे कितीही तुम्ही कागद पाठवा काही हरकत नाही. तुम्ही करत राहा आम्ही लढत राहू. महाराष्ट्र आणि शिवसेनेची लढण्याची परंपरा आहे. अशा कितीही नोटिसा पाठवल्या, चिखलफेक केली, खोटेनाटे आरोप केले तरी आम्ही डगमगणार नाही, हे लिहून घ्या,” असं राऊत म्हणाले.

कागदाच्या सूरनळ्या हे आमचं अस्त्रं

तसेच पुढे बोलताना माझी 100 लोकांची यादी लवकरच येणार. मी कालच म्हणालो लढाई कायदेशीर होईल. कागद हे त्यांचं शस्त्रं असेल तर कागदाच्या सूरनळ्या हे आमचं अस्त्रं आहे, असही राऊत म्हणाले.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

Anil Parab ED Notice | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान

मोठी बातमी, अजित पवारांची झोपडपट्टीमुक्त पुण्याची घोषणा, 17 झोपडपट्यांबाबत पुढच्या आठवड्यात बैठक

(enforcement directorate ed issued notice to minister Anil Parab Shivsena leader Sanjay Raut said will fight this battle with help of law)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.