चित्रपटात नाही तर प्रत्यक्षात भावी इंजिनिअर मोबाईल समोर ठेऊन करत होते कॉपी
संजय दत्त याच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात कॉपी करुन एमबीबीएस झाल्याची कथा आहे. परंतु संजय दत्त हा परीक्षेला डमी विद्यार्थी बसवतो आणि पास होतो. परंतु या ठिकाणी एक नाही सर्व वर्गच कॉपी करताना दिसत आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्राला धक्का बसला आहे.

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर, 16 डिसेंबर | शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील शुटींग वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी भावी इंजिनिअर आहेत. संजय दत्त याच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटापेक्षाही धक्कादायक प्रकार या ठिकाणी सुरु आहे. चित्रपटात संजय दत्त हा परीक्षेला डमी विद्यार्थी बसवतो आणि पास होतो. परंतु सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
चक्क मोबाईल समोर ठेवून सुरू होती कॉपी
परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क मोबाईल समोर ठेवून कॉपी सुरु आहे. सामूहिक कॉफीचा हा प्रकार नुकताच उघड झाला आहे. वर्गातील अनेक परीक्षार्थी कॉपी करताना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. कॉपीचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ ॲक्शन मोडवर आले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखाला तातडीने कार्यमुक्त केले आहे. नागनाथ आप्पा हलगी महाविद्यालयातील धक्कादायक प्रकारानंतर शिक्षण क्षेत्र हादरले आहे.




13 डिसेंबर २०२३ नागनाथ हालगे आप्पा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. या ठिकाणी परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तपासल्यानंतर बहुतांश डमी विद्यार्थी बसल्याचे दिसून आले. बहुतांश विद्यार्थ्याकडे मोबाईल दिसून आले. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान सर्रास मोबाईलचा वापर केला. सुमारे शंभर ते दीडशे मोबाईल सकाळच्या सत्रात जप्त करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक हॉल तपासणी करत असताना सर्रास मोबाईलचा प्रकार आढळून आला.
प्राध्यापकांसमोर मोबाईलचा वापर
परीक्षांमध्ये बंदी असून सुद्धा प्राध्यापकाच्या समोर विद्यार्थी मोबाईलचा वापर परीक्षेत करत आहे. प्राध्यापक प्राचार्य आणि कॉलेजचा चिप्स सुप्रीडेंट यांना हा प्रकार माहिती असून सुद्धा कोणतीही कारवाई केली गेली नाही. तसेच दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा प्रत्येक हॉलमध्ये दोन, तीन डमी विद्यार्थी होते. हा सर्व प्रकार विद्यापीठाने नियुक्त केलेले सहकेंद्र प्रमुख प्रा.दशरथ रोडे यांनी उघड केला आहे.
बीडमधील परळी कॉलेजमध्ये सुरु असलेला कॉपीचा प्रकार pic.twitter.com/2P73LSLB7d
— jitendra (@jitendrazavar) December 16, 2023