Omicron Update |पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव : जिल्ह्यासह ,पालिका प्रशासन अर्लट ; परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची RT-PCR निगेटिव्ह

पुणे शहरात 1 , पिंपरी चिंचवड शहरात 6 तर आळंदीमध्ये 1 अश्या सात नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह आळंदीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Omicron Update |पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव : जिल्ह्यासह ,पालिका प्रशासन अर्लट ; परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची RT-PCR निगेटिव्ह
OMICRON
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 7:51 PM

पुणे – पुण्यात अखेर ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात 1 , पिंपरी चिंचवड शहरात 6 तर आळंदीमध्ये 1 अश्या सात नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह आळंदीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह!

पुणे शहरात 438  नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी 370  नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370  पैकी 335  नागरिकांपर्यंत पोहोचण्यात महापालिकेला यश  आले आहे. आतापर्यंत 267  नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत

जिल्हा प्रशासनाने बनवली यादी

ओमीक्रॉनच्या धास्तीमुळं प्रशासन सर्तक झाले होते . प्रशासनाने आतापर्यंत परदेशातून पुणे व जिल्ह्यात आलेल्या प्रवाश्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पुणे -438 पिंपरी -चिंचवडमध्ये – 131, ग्रामीण भागात – 67, खडकी कटक मंडळात  -6 पुणे कटक मंडळात-  1

ग्रामीण भागात परदेशातून आलेलया नागरिकांची संख्या हवेली तालुक्यात सर्वाधित – 29 मुळशीत- 11 , बारामतीत – 3, इंदापूर -3 , जुन्नर -3

जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मिळवली आहे तेथील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना या व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत .त्यांना शोधून त्यांच्या पत्त्याची तपासणी करून चाचणी करण्यात येणार आहे. येत्या दोन- तीन दिवसात ही कार्यवाही पूर्ण करणार असल्याची माहितीही जिल्हा आरोग्य प्रमुख  डॉ . भगवान पवार दिली आहे .

त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मिळाला होता दिलासा

झांबिया देशातून 20 दिवसांपूर्वी पुण्यात आलेला व कोविड पॉझिटिव्ह असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे काही काळ पुणेकरांना दिलासा मिळाला होता. या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 30 नोव्हेंबरला त्याची जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करण्यात आली होती.त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला होता. या चाचणीमध्ये ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले, मात्र व्यक्तीला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे समोर आले आहे

महापालिका अर्लट मोडवर ओमिक्रॉनचा धोका लक्ष्यात घेऊन पुणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाश्याची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याच्या तयारी सोबतच लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत पुण्यात कोरोनाचे नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत.

या नियमांचे करावं लागेल पालन

  • या पुढे परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची आरआरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट विमानतळावरच केली जाणार आहे.
  • त्याचबरोबरा परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकालासात दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे.
  • शहरातील लसीकरणाचा वेग वा वाढवण्यात येणारआहे .
  • शहरातील सरकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्हीडोस घेतलेले असणे बंधनकारक असेल.
  • कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे सक्तीचे असले.
  • प्रत्येक नागरिकाला मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. विना मास्क सापडल्यास त्या व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकाराला जाईल.
  • याबरोबरच शहारातील सांस्कृतिक ठिकाणे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहासह केवळ बंदिस्त जागेतच केवळ ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येईल.
  • लग्नांसारख्या कार्यक्रमांना केवळ ५० टक्के उपस्थित राहता येणार आहे.
  • खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी केवळ २५जणच हजार राहू शकणार आहेत.
  • आस्थापनाधारकास नियम न पाळल्यास दहा हजार रुपयांचा होणार दंड आकारण्यात येणार आहे.

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

पुण्यात 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित, लस घ्या अन् कोरोना नियम लाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.