कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

'कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे', अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:50 PM

मुंबई: संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.(Establishment of Task Force for Corona Vaccination in the State, Information of Chief Minister Uddhav Thackeray)

‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा सिरमच्या अदर पुनावाला यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळतंय. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे. पंतप्रधान मोदी हे 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.

‘सिरम’ची कोरोना लस 225 रुपयांना!

सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

संबंधित बातम्या:

CORONA UPDATE : 100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

PM Modi Meeting With All CM | पंतप्रधान मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक, कोरोना रुग्ण, लॉकडाऊन, लस वितरण यावर चर्चा

कोरोनावरील लस वितरणासाठी केंद्र सरकारचं मेगा प्लॅनिंग, सिरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीशी संपर्क

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

Establishment of Task Force for Corona Vaccination in the State, Information of Chief Minister Uddhav Thackeray

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.