केंद्राच्या लुडबुडीचा अतिरेक होतोय? उद्धव ठाकरे म्हणतात, आता सर्व राज्यांनी एकत्र येण्याची वेळ
पण आलीच तर दाखवावेच लागेल. मग हा सत्तापिपासूपणा नाही आहे काय?, वैचारिक लढा ठीक आहे, पण यात कुठला विचार आहे. तोंडामध्ये बोंडक घालून शिवसेनेला बदनाम करणारी लोकं बसली असतील. 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते, बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत.
मुंबईः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. केंद्र सरकारचा राज्यांच्या कारभारात होत असलेल्या हस्तक्षेपावरून उद्धव ठाकरेंनी प्रहार केलाय. महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी केंद्र आणि राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले गेले. आणीबाणी, परकीय आक्रमण आणि विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये, असंही उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावलंय.
मार्मिक सदर वाचा आणि थंड बसा
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलत होते. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी आता ते बंद करावे. मार्मिक सदर वाचा आणि थंड बसा. भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाला वाचा. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी आहे. परंतु समानतेची हिंदुत्वाची शिवसैनिकांना शिकवण आहे. सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.
हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवू
हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता. त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल, बाल आणि पाल पुढे होता, महाराष्ट्र एक पुढे होता, पंजाब एक पुढे होता आणि पश्चिम बंगाल एक पुढे होता. बंगालनं त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. खरोखर ममतादीदी आणि बंगाली जनतेला मी धन्यवाद देतोय. तुम्ही ती न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. तीच जिद्द आपल्यासुद्धा रगामध्ये आणि रक्तामध्ये आहे ही आपल्याला तयारी ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिलाय.
तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?
पण आलीच तर दाखवावेच लागेल. मग हा सत्तापिपासूपणा नाही आहे काय?, वैचारिक लढा ठीक आहे, पण यात कुठला विचार आहे. तोंडामध्ये बोंडक घालून शिवसेनेला बदनाम करणारी लोकं बसली असतील. 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते, बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत. 92-93 साली शिवसैनिक हे मर्द उतरले नसते तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.
आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही
केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला. त्याच्यावर आरोप करताय. मागेही सांगितलं आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. पण ती आमची राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीची पालखी आहे. हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून? वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. ही जी काही थेरं सुरू आहेत ते हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गांधी आणि सावरकर तरी समजले का?
सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट