मजुरांचा माध्यमातून नोटा बदलण्याचे रॅकेट, नागपुरातून थेट दिल्ली, गुजरात कनेक्शन

Crime News: १९ मे २०२३ रोजी चलनातून २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा आहेत ते बदलून देण्याचे काम महाराष्ट्रातील नागपूर, बेलापूर आणि मुंबई या तीन ठिकाणी होत आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन २० हजारापर्यंत नोटा बदलून दिल्या जातात.

मजुरांचा माध्यमातून नोटा बदलण्याचे रॅकेट, नागपुरातून थेट दिल्ली, गुजरात कनेक्शन
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 2:48 PM

Crime News: भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलवून देणारे मोठे रॅकेट उघड झाले आहे. नागपूर पोलिसांनी कारवाई करत हे रॅकेट उघड केले आहे. चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मजुरांच्या माध्यमातून बदलवून घेण्याचे काम हे रॅकेट करत होते. या रॅकेटचे कनेक्शन थेट दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशपर्यंत आहे. नोटा बदलून घेणाऱ्या टोळीचा म्होरक्या अनिलकुमार जैन आहे. त्याने आतापर्यंत कोट्यवधीच्या नोटा बदलवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

असा होता नोटा बदलण्याचा उद्योग

१९ मे २०२३ रोजी चलनातून २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा आहेत ते बदलून देण्याचे काम महाराष्ट्रातील नागपूर, बेलापूर आणि मुंबई या तीन ठिकाणी होत आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन २० हजारापर्यंत नोटा बदलून दिल्या जातात. त्यामुळे अनिलकुमार जैन हा दिल्ली आणि उत्तरप्रदेशातून २ हजारांच्या चलनी नोटा आणतो. त्यानंतर या नोटा बदलण्यासाठी नागपुरातील नंदलाल मोर्या, रोहित बावणे आणि किशोर बहोरीया यांना देतो. ही लोक झोपडपट्टी असलेल्या भागांत जातात. त्याठिकाणी लोकांना ३०० रुपये मजुरी देऊन आरबीआयमधून नोटा बदलवून आणण्यास सांगतात. सुमारे दीड वर्षांपासून त्यांचा हा उद्योग सुरु होता.

आरोपींना जबलपूरमधून अटक

अनिलकुमार जैन याच्या रॅकेटचे कनेक्शन थेट दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यांपर्यंत आहे. त्याच्यामागे व्यापाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाली. नागपूर सदर पोलिसांनी दलाल नंदलाल मोर्या, किशोर बोहरिया, आणि व्यापारी अनिलकुमार जैन जबलपूर-मध्यप्रदेश यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी अनिलकुमार जैन दिल्ली आणि उत्तरप्रदेशातून व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीत २ हजारांच्या चलनी नोटा आणतो. त्या नागपूर आणि इतर ठिकाणांहून बदलून घेतो.

हे सुद्धा वाचा

असा उघड झाला प्रकार

गेल्या तीन महिन्यांत नागपुरातील आरबीआय शाखेत नोटा बदलून घेण्याची गर्दी अचानक वाढली. नोटा बदलून घेणारे झोपडपट्टीतील आणि गरीब वर्ग आहे. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. या प्रकरणात पोलीसांचा अधिक तपास सुरु आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....