Nashik Sahitya Sammelan ‘ऐसी अक्षरे’मध्ये पालवांची कॅलिओग्राफी रंगली…!

कुसुमाग्रजनगरी, नाशिक नाशिकमध्ये सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी अच्युत पालव यांचा ऐसी अक्षरे हा कार्यक्रम रंगला. यावेळी त्यांनी उपस्थितांना कॅलिओग्राफीचे प्रात्यक्षिक दाखवून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात अच्युत पालव म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक दिलेला सन्मान दिला याचा आनंद होत आहे. यावेळी पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन […]

Nashik Sahitya Sammelan 'ऐसी अक्षरे'मध्ये पालवांची कॅलिओग्राफी रंगली...!
साहित्य संमेलनात अच्युत पालवांनी कॅलिओग्राफीचे प्रात्यक्षिक दाखवले.
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 3:23 PM

कुसुमाग्रजनगरी, नाशिक नाशिकमध्ये सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी अच्युत पालव यांचा ऐसी अक्षरे हा कार्यक्रम रंगला. यावेळी त्यांनी उपस्थितांना कॅलिओग्राफीचे प्रात्यक्षिक दाखवून मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमात अच्युत पालव म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक दिलेला सन्मान दिला याचा आनंद होत आहे. यावेळी पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित होते. ते म्हणाले की, चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे. त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो. साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी, शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकला ही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खासदार तथा संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळ, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, साहित्य संमेलनात इतिहासात पहिल्यांदाच बालसाहित्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बाल साहित्य मेळाव्यात अनेक बाल चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी या बालकरांनी विविध सुंदर चित्रे रेखाटली. या बाल मेळाव्यात 3 वर्षाची ओजस्वी काने ही चिमुकली चित्र कलाकार देखील सहभागी झाली. तसेच इयत्ता 5 वीत शिकणारा मयुरेश आढाव या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी लावण्यात आले होते.

अन् झरझर रेषांतून… अच्युत पालव यांचा कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. त्यांनी त्यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून साकरलेली शब्दलिपी एका कवितेसारखी होती. वळणदार आणि घाटदार अक्षरे, त्यांच्यातले सौंदर्य उपस्थितांना मोहवून गेले. विशेषतः बच्चे कंपनी आणि विद्यार्थ्यांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रम उशिरा सुरू

साहित्य संमेलनातील सर्वच कार्यक्रम बहुतेक उशिरा सुरू होत आहेत. जवळपास तासाभारापेक्षा जास्त विलंब होत आहे. त्यात एकाच वेळी अनेक कार्यक्रम. त्यामुळे रसिकांची तारंबळ उडत आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू झाल्यास साऱ्यांनाच या कार्यक्रमाचा चांगला आस्वाद होणार नाही आणि रसिकांचाही त्रास कमी होईल.

इतर बातम्याः

Jawed Akhtar Speech | जे युरोपात नव्हतं, देशातही नव्हतं ते महाराष्ट्रात, जावेद अख्तरांनी मराठी जनांना ‘गर्वा’चं घर दाखवलं…!

Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाला हिंडता-फिरता अध्यक्ष असावा; कौतिकराव ठाले-पाटलांच्या सूचना

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.