Maharashtra Rains: सावधान! पुढचे पाच दिवस धोक्याचे; पालघर, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पावसाचा इशारा

कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरीत अती वृष्टीचा इशार देण्यात आला आहे. यासह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान केंद्राने 9 ते 13 जुलै पर्यंत हा अलर्ट जारी केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Maharashtra Rains: सावधान! पुढचे पाच दिवस धोक्याचे; पालघर, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पावसाचा इशारा
पाऊसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 6:32 PM

मुंबई: मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहेत(Maharashtra Rains). त्यातच आता पुढचे पाच दिवस धोक्याचे असणार आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबाकडून (Regional Meteorological Center Colaba) जिल्हयानिहाय पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरीत अती वृष्टीचा इशार देण्यात आला आहे. यासह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान केंद्राने 9 ते 13 जुलै पर्यंत हा अलर्ट जारी केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबईत हाय टाईड येण्याची शक्यता

मुंबईत थोड्या थोड्या विश्रांतीने पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सांगली, सोलापूरात हलका पाऊस

पुढील पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांतून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

नदीकाठी असणाऱ्या गावांना इशारा

पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावसह अहमदनगर नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस

तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, अहमदनगरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विजांसह गडगडाट

र ढगांच्या गडगडाटासह विजांसह जोरदार वारा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत, तर काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.