Fact Check : मिसेस मुख्यमंत्री RTO कार्यालयातील रांगेत उभ्या! पण आजी की माजी? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

तुम्ही फेसबुकवर सक्रिय असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या मुंबईतील आरटीओ कार्यालयात रांगेत उभ्या राहिल्याची आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवल्याची एक पोस्ट वाचनात आली असेल. शिवसेना भवन नावाच्या पेजवर ही पोस्ट कदाचित तुम्ही लाईकही केली असेल.

Fact Check : मिसेस मुख्यमंत्री RTO कार्यालयातील रांगेत उभ्या! पण आजी की माजी? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
रश्मी ठाकरे, अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 10:22 PM

मुंबई : सोशल मीडिया (Social Media) हे सर्वसामान्य नागरिकाच्या हातील सर्वात प्रबळ आणि सोपं माध्यम म्हणून ओळखलं जातं. त्यात फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मचा समावेश आहे. मात्र, या माध्यमांवरील काही मजकूर किती खरा आणि किती खोटा? त्याची सत्यता काय? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook Post) या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. तुम्ही फेसबुकवर सक्रिय असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या मुंबईतील आरटीओ कार्यालयात रांगेत उभ्या राहिल्याची आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवल्याची एक पोस्ट वाचनात आली असेल. शिवसेना भवन नावाच्या पेजवर ही पोस्ट कदाचित तुम्ही लाईकही केली असेल.

रश्मी ठाकरेंबाबतची व्हायरल पोस्ट नेमकी काय?

मुंबईच्या एका RTO कार्यालयात एक महिला चालत आली, तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनीकरण करण्यासाठी.‌‌…. त्या महिलेने नुतनीकरण फार्म घेतला तो व्यवस्थित भरला कागदपत्रे घेउन ती रांगेत उभी राहीली, हळुहळू क्रमांक पुढे सरकत होता, त्या महिलेची कागदपत्रे घेतली नुतनीकरण चलनाचे पैसै भरले. व सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO कार्यालया बाहेर पडणार तोच क्लार्क ने कागदपत्रे वाचली सौ. #रश्मी_उद्धव_ठाकरे….

तो आश्र्चर्यचकित झाला, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी इतक्या वेळ रांगेत उभ्या होत्या.मग काय पळापळ सुरु झाली. सर्व अधिकारी पळत आले, सौ. मुख्यमंत्राना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे. त्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण त्वरित करून देतो.

सौ. मुख्यमंत्री यांनी गोड शब्दांत नकार दिला. मी फार्म भरला आहे, आणि नुतनीकरणाचे चलनही भरले आहे, आता तुमच्या नियमानुसार मला स्पिड पोस्टने परवाना पाठवा. गाडी सुरु करुन त्या निघुनदेखील गेल्या, एव्हाना अधीकार्याचे कपाळ घामाने थबथबले होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी अन् RTO कार्यालयात रांगेत उभी राहते यावर विश्वास बसत नव्हता!

‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र’ पेजवरील पोस्टही वाचा

आता या पोस्टची एक गंमत तुम्हाला सांगतो. फेसबुकवर ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र’ असंही एक पेज चांगलंच प्रचलित आहे. भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे चाहते या पेजला नक्कीच फॉलो करत असतील. या पेजवर 6 फेब्रुवारी 2019 रोजी अशीच एक पोस्ट टाकण्यात आली होती. ती पोस्टही तेव्हा चांगलीच व्हायरल झाली होती. वर रश्मी ठाकरे यांच्याबाबत जी पोस्ट तुम्ही वाचली अगदी तशीच ही पोस्ट आहे. या दोन्ही पोस्टमधील मजकूर अगदी सारखाच आहे फक्त ठिकाण आणि मिसेस मुख्यमंत्र्यांचं नाव वेगळं आहे. या पोस्टमध्ये अमृता देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे.

Amruta Fadnavis Post

अमृता फडणवीसांबाबतची फेसबुक पोस्ट

फक्त पोस्ट, पुरावा काय?

आता वरील दोन्ही पोस्ट वाचा आणि त्यातील साम्य जाणून घ्या. महत्वाची बाब म्हणजे या पोस्टमध्ये सांगितल्या गेल्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस किंवा सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापैकी कुणाचाही आरटीओ कार्यालयात रांगेत उभारलेला फोटो देण्यात आलेला नाही. अथवा तसा अन्य कुठलाही पुरावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या आणि अशा पोस्टवर किती विश्वास ठेवायचा हा मोठाच प्रश्न आहे.

इतर बातम्या :

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात 15 हजारापेक्षा अधिक रुग्ण, तिघांचा मृत्यू

तुमच्या मुलाला दूरचं पाहताना होतोय त्रास?..त्याला असू शकतो हा डोळ्यांचा आजार…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.