केंद्रात मंत्रिपदाची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवासंपासून सुरू आहे, याबाबत त्यांनी आता मोठा खुलासा केला आहे.

केंद्रात मंत्रिपदाची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणतात...
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 9:08 PM

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवासंपासून सुरू आहे. यावर आता फडणवीस यांनीच मोठा खुलासा केला आहे. ते टीव्ही 9 च्या  सत्ता संमेलनमध्ये बोलत होते. मी नेहमीच सांगतो जेव्हा दिल्लीच्या पत्रकारांकडे काही बातम्या  नसतात तेव्हा ते अशा बातम्या करतात, असं होत नाही. कोणतीही अशी ऑफर नाही. भाजपमध्ये व्यक्ती किंवा नेते निर्णय घेत नाहीत तर पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

मी नेहमीच सांगतो जेव्हा दिल्लीच्या पत्रकारांकडे काही बातम्या नसतात तेव्हा ते अशा बातम्या करतात. असं होत नाही, कोणतीही अशी ऑफर नाही. भाजपमध्ये व्यक्ती किंवा नेते निर्णय घेत नाहीत. पार्लमेंट्री बोर्ड असते तेच निर्णय घेतात. माझा पक्ष दिल्लीत जायला सांगेल तर मी दिल्लीत जाईल. मुंबईत राहायला सांगितलं तर मुंबईत राहील. माझ्या पक्षाने सांगितलं तुमचा उपयोग नाही घरी बसा तर घरी बसेल. माझ्या मनात हेच आहे, देवेंद्र फडणवीस हे आपल्या मनाने चालत नाहीत, पक्षाच्या मनाने चालतात. पार्टीने जेव्हा सांगितलं तेव्हा एका मिनिटात उपमुख्यमंत्री झालो. पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेलो पक्षाच्या आदेशानंतर मी उपमुख्यमंत्री झालो. मी काही राजपत्र घेऊन आलो नाही, ताम्रपत्र घेऊन आलो नाही. पक्षाने जे सांगितलं ते मी केलं. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमध्ये निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला की आम्ही देखील लगेच घोषणा करू, आमच्याकडे चेहरा आहे. त्यांच्याकडे आहे का त्यांना विचारा. निवडणुकीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि आमचं पार्लमेंट्री बोर्ड बसून याबाबत निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.