VIDEO: पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय? पडळकरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नावर फडणवीस आक्रमक, अजित पवार म्हणाले, त्यांनी तार्तम्य बाळगावं

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पडळकर यांच्यावर पोलीस ठाण्यासमोर हल्ला केला. हा हल्ला कसा झाला, हे एका क्लीपमधून समोर आले. विशेष म्हणजे या हल्ल्याचे चित्रिकरण पोलिसांनी केले, असा आरोप त्यांनी केला.

VIDEO: पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय? पडळकरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नावर फडणवीस आक्रमक, अजित पवार म्हणाले, त्यांनी तार्तम्य बाळगावं
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस.
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 2:10 PM

मुंबईः विधिमंडळ अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील खडाजंगी आज सोमवारी जोरदार रंगली. त्यात विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. मात्र, अजित पवारांनी तार्तम्य बाळगण्याचा सल्ला दिला.

नेमके प्रकरण काय?

विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली, सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप केला होता. त्याचा फोटोही ट्वीट केला होता. शिवाय दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचे शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबतचे फोटोही समोर येत आहेत. या प्रकरणाचे आज विधिमंडळात पडसाद उमटले.

फडणवीस आक्रमक

पडळकरांवरील हल्ल्यावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले, पडळकर यांच्यावर पोलीस ठाण्यासमोर हल्ला केला. हा हल्ला कसा झाला, हे एका क्लीपमधून समोर आले. विशेष म्हणजे या हल्ल्याचे चित्रिकरण पोलिसांनी केले, असा आरोप त्यांनी केला. मात्र, याप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई न करता गोपीचंद पडळकर यांच्यावर कलम 307 लावण्यात आले. हा हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवर पडळकरांना कसा धडा शिकवला, असे ट्वीट करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी सारे पुरावे विधानसभा अध्यक्षांना देऊ, असे फडणवीस म्हणाले. तसेच याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत. सरकारचा या घटनेशी थेट संबंध आहे. सत्ता पक्षाच्या बापाचे पोलीस आहेत का? या राज्याचे पोलीस आहेत, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. राज्यात जे चाललंय ते योग्य नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवा आणि बंगाल होऊ देऊ नका. गोपीचंद पडळकर यांच्यावरील 307 चा गुन्हा मागं घ्या, अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली.

सबुरीचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याप्रकरणी विरोधी पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला देत तार्तम्य बाळगण्याचे आवाहन केले. अजित पवार म्हणाले की, विरोधकांनी पडकररांचा हल्ला असो की आरोप-प्रत्यारोप कुठल्याही बाबतीत तार्तम्य बाळगावं. अजित पवारांकडे राज्य दिलं, तर चार दिवसात राज्य विकतील, हे काय बोलतात. दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधकांनी, दोन्ही सभागृहातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील सहकाऱ्यांनी भान राखलं पाहिजे. मी शंभूराज देसाई यांच्याशी संरक्षण देण्याबाबत चर्चा केली आहे. काही सदस्य संरक्षण नाकरतात. जे कोणी दोषी असतील त्या संदर्भात योग्य ती कारवाई करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

इतर बातम्याः

VIDEO: नितेश राणेंनी चुकच केली, फडणवीसांनी पुन्हा फटकारलं, आघाडी सरकारच्या मनसुब्यावरही भाष्य

बिलाच्या सुतावरून गाठला 257 कोटींचा स्वर्ग; तळघरात माया, त्याच्या 500 चाव्या, अत्तर व्यापाऱ्याच्या कारनाम्याचा दरवळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.