VIDEO | महाराष्ट्रात बदल्यांचा महाघोटाळा; रसद केंद्रीय गृहसचिवांना दिली, फडणवीसांचा धमाका!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नोटीस अचानक येण्याचे कारण सभागृहात मी जे विषय मी मांडतोय किंवा दाऊदशी असलेले संबंध असतील. त्यामुळे मला नोटीस पाठवण्यात आली. कालच मी जाणार असे सांगितले होते. मग पोलिसांकडून आम्हीच आपल्याकडे चौकशीसाठी स्टाफ पाठवतो, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार ते आज आले.
मुंबईः राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. ही रसद मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहचवली आहे, असा धमाका रविवारी मुंबई (Mumbai) पोलिसांनी (Police) केलेल्या चौकशीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र ही लढाई सुरू राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. याची सगळी माहिती मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर हायकोर्टाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. याचा अर्थ हा घोटाळा घडला. मात्र, या घोटाळ्याची चौकशी सरकार करू शकत नाही. मी जर हा घोटाळा काढला नसता, तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता, असा दावा त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. मी त्यांना पत्र दिले होते. मी त्याचे उत्तर देणार असे कळवले होते. त्यांनी हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली. मात्र, ही नोटीस अचानक येण्याचे कारण सभागृहात मी जे विषय मी मांडतोय किंवा दाऊदशी असलेले संबंध असतील. त्यामुळे मला नोटीस पाठवण्यात आली. कालच मी जाणार असे सांगितले होते. मग पोलिसांकडून आम्हीच आपल्याकडे चौकशीसाठी स्टाफ पाठवतो, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार ते आज आले.
व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू करा…
फडणवीस म्हणाले की, वळसे- पाटील साहेब जे म्हणाले त्याच्यात फरक काय आहे. मला जे प्रश्न पाठवले होते आणि आज जी चौकशी झाली, त्यात फरक आहे. ऑफिशिअल सीक्रसी अॅक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप माझ्यावर केला जातोय. जणू काही मला आरोपी-सहआरोपी बनवता येईल का, असे प्रश्न मला विचारण्यात आले. मी स्पष्टपणे त्यांना उत्तरे दिली. गोपनीय कायदा लागू होतो की नाही, यावर मी बोलणार नाही. मात्र, व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी व्हिसल ब्लोअर आहे.. न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा आहे, असा दावा त्यांनी केला.
जबाबदार नेत्यांसारखा वागलो…
फडणवीस पुढे म्हणाले की, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्या संदर्भात अग्रेशित केलेले पत्र दाखवले. ट्रान्सस्क्रिप्ट किंवा पेनड्राइव्ह मी कोणालाही देणार नाही. हे संवेदनशील प्रकरण आहे. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला, त्याची कागदपत्रे मी त्यांना दिले, तरी त्यांनी यात काय दिवे लावले असते. ही सगळी कागदे मी केंद्रीय गृहसचिवाला दिले. मी ते पब्लिक डोमेनमध्ये आणले नाहीत.
मलिकांची चौकशी करा…
चौकशी झाली पाहिजे तर ती मलिकांची झाली पाहिजे. पोलिस मानतात की, ही गोपनीय माहिती होती, तर मलिकांना प्रेसला देण्याचा तो अधिकार होता का, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला, तरीही मला गोवू शकत नाही. मी काळे कारनामे बाहेर काढतच राहीन. सगळे संवेदनशील प्रकरण मी पब्लिक डोमेनमध्ये न आणता योग्य ठिकाणी दिले आहे. सरकारला यातून काहीही हाती लागणार नाही. सरकारचे मनसुबे पुरे होऊ शकणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?