महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार, फडणवीसांचा इशारा!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विजयाचा आनंद एक दिवस असतो. आम्ही तो साजरा केला. आज रात्रीपासून पुन्हा एकदा कामाला लागू. ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, महिला, दलित आदिवासी यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारविरोधात पुन्हा संघर्ष सुरू होईल.

महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार, फडणवीसांचा इशारा!
देवेंद्र फडणवीस.
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 11:28 AM

मुंबईः महाराष्ट्रामध्ये सत्तांतर अटळ आहे. मुंबईला (Mumbai) भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढू, असा इशारा शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला दिला. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या फडणवीसांचे मुंबई भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, आम्हाला सगळ्यांना चार राज्यातील विजयाचा मनापासून आनंद झाला आहे. या निवडणुकीने सिद्ध केले की, सामान्य माणसाच्या, कष्टकरांच्या मनात अजूनही एकच नेते आहेत. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदीजींच्या नेतृत्वात भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला. देशातले सर्वात मोठे 25 कोटी लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशमधूनच लोकसभेचा आणि दिल्लीचा रस्ता जातो. 37 वर्षांत पहिल्यांदा एका पक्षाने सलग उत्तर प्रदेश जिंकल्याचा पराक्रम केल्याचेही ते म्हमाले.

शिवसेनेला डिवचले

विरोधी पक्षनेते यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला डिवचले. मध्यमवर्गीय, सामान्य, महिला या मोदीजी आणि भाजपच्या पाठिशी आहेत. गोव्यात सत्ताविरोधी लाट असल्याचे म्हटले गेले. मात्र, मोदींमुळे तीच लाट सत्ता स्थापन करण्यासाठी उपयोगी पडली, असा दावा त्यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई गोव्यात नोटाशी होती. त्यांना नोटापेक्षांही कमी मते मिळाली. शिवसेनेने प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात सभा घेऊन सिंहगर्जना केली. मात्र, त्यांच्या उमेदवाराला फक्त 97 मिळाल्याचे ते म्हणाले.

रात्रीपासून पुन्हा कामाला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विजयाचा आनंद एक दिवस असतो. आम्ही तो साजरा केला. आज रात्रीपासून पुन्हा एकदा कामाला लागू. ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, महिला, दलित आदिवासी यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारविरोधात पुन्हा संघर्ष सुरू होईल. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराच्या विळखण्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आहे. ती पार पाडू.

केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्र

केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्र नेहमीच राहिला आहे. कोरोना काळात सर्वाधिक निधी, पीपीई किट महाराष्ट्राला मिळाले. केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्राचा विकास आहेच. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून, 2024 मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असा दावा फडणवीस यांनी केला. शिवाय मोदींनी बेकायदेशीर काम करणाऱ्यांना इशारा दिल्याचेही ते म्हणाले.

इतर बातम्याः

राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी मांढरे; नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार गंगाथरन यांनी स्वीकारला

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.