कोरियातील सिंगरला भेटण्यासाठी 3 अल्पवयीन मुलींचा अपहरणाचा कट; तपासात मोठा खुलासा
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींनी कोरियातील BTS ग्रुपला भेटण्यासाठी स्वतःचे अपहरण करण्याचा कट रचला. पण हा बनाव अवघ्या 30 मिनिटांत पोलिसांनी उघड केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
कोरियातील BTS या सिंगर आणि डान्सर ग्रुपला भेटण्यासाठी तीन आल्पवयीन मुलींनी अपहरणाचा कट रचल्याचं उघड झालं आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींचा अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. उमरगा तालुक्यातील निळू नगर तांडा येथे अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आलीय. उमरग्याच्या निळू नगर तांड्यावर तीन मुलींनी कोरीयन डांस ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचला. मात्र अवघ्या 30 मिनिटात तो कट पोलिसांनी उधळून काढला आणि या तीन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले.
उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा कट मुलींनी केला आणि त्या थेट पुण्याच्या दिशेने निघाल्या. मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेने अवघ्या 30 मिनिटात 3 अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव उघड झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथून मुलींनी स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली. त्यानंतर मोबाईलच्या सिम लोकेशनवरून पोलिसांनी लोकेशन मिळवून मुलींना गाठलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथे पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधीन केले. कोरियाला जाण्यासाठी मुलींनी स्वत:च्या घरातूनच 5 हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा मुलींचा प्लॅन होता.
उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथून शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबसमधून काही लोकांनी किडनॅप करून घेवून गेले आहेत. त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून चाकुचा धाक दाखवुन त्यांना नेले आहे, असा कॉल पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी मुलींना अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढलं. मात्र एवढ्या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील सिंगर आणि डांसर ग्रुपच्या प्रेमात कशा पडल्या? ही आश्चर्य व्यक्त करणारी घटना आहे.