VIDEO : साहेब, धनुभाऊला मुख्यमंत्री करा, पवारांसमोर शेतकऱ्याची मागणी  

बीड : देशाची माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यातील दुष्काळाची पाहणी करत आहेत. याच निमित्ताने शरद पवार आज बीडमध्ये होते. त्यांनी बीडमधील शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यावेळी एका वयोवृद्ध शेतकऱ्यांनी भर सभेत शरद पवारांना उद्देशून म्हटलं, “धनुभाऊंना मुख्यमंत्री करा.” त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. नेमकं काय झालं? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा […]

VIDEO : साहेब, धनुभाऊला मुख्यमंत्री करा, पवारांसमोर शेतकऱ्याची मागणी  
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

बीड : देशाची माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यातील दुष्काळाची पाहणी करत आहेत. याच निमित्ताने शरद पवार आज बीडमध्ये होते. त्यांनी बीडमधील शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यावेळी एका वयोवृद्ध शेतकऱ्यांनी भर सभेत शरद पवारांना उद्देशून म्हटलं, “धनुभाऊंना मुख्यमंत्री करा.” त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज बीड जिल्ह्यात दुष्काळ दौरा होता. बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी इथे चारा छावणीत शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना अचानक बोलायला उठलेल्या शेतकऱ्याने “धनुभाऊ सारखा मुख्यमंत्री जर कधी झाला ना” असं म्हटलं आणि सभेत एकाच जल्लोष झाला. शेतकऱ्याने हे वाक्य उच्चारल्यानंतर शरद पवार यांनीही हात उंचावून होकार दिला.

यापूर्वी पंकजा मुंडे यांनी “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे” असं वक्तव्य केलं होतं आणि आता नवगण राजुरी इथल्या शेतकऱ्याने धनंजय मुंडेंसारखा मुख्यमंत्री पाहिजे असं वक्तव्य केलं त्यामुळे धनंजय मुंडे हे सुद्धा लोकाग्रहास्तव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येऊन बसले आहेत.

यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुम्ही सांगितलेल्या अडचणी त्यांना सांगणार, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मदत करण्याचा आग्रह धरणार आहोत आणि आपल्याला अनुकूल असा निकाल त्यांना घ्यायला भाग पाडू.”

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला पवारांची भेट

बीड जिल्ह्याची दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आज शरद पवार होते. शरद पवार यांनी खडकत गावापासून दुष्काळी दौरा केला. पवारांनी चार ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मात्र परत जाताना आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील शरद साबळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे समजताच पवारांचा ताफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी पोहचला. भेटीला अचानक शरद पवार आणि धनंजय मुंडे आल्याने पीडित कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. कर्ज कसे फेडायचे अशी चिंता व्यक्त करताच कर्ज फेडू नका आम्ही पाहून घेतो, असे पवार आणि मुंडे म्हणाले. आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर पवार यांनी मयताच्या कुटुंबाला दिला.

VIDEO : पाहा शेतकरी नेमका काय म्हणाला?

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.