कोरोना, परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, उभं पिक दिलं पेटवून

पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कोरोना, परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट, उभं पिक दिलं पेटवून
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 5:15 PM

गोंदिया : एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अशात आता शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं ठाकलं आहे. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आधीच मोठं नुकसान झालं असताना आता कापणीला आलेल्या धानपिकाला मावा तुडतुडा रोगामुळे शेतकऱ्यांचं धान्य खराब झालं असल्याने आता शेतकरी उभा धानपिक कापण्या योग्य नसल्याने शेतकरी धानपिकाला आग लावत आहेत. (Farmers crops were damaged due to Insects in gondiya)

पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पूर्व विदर्भात सगळ्यात जास्त धान्य पीक भंडारा गोंदिया जिल्ह्यात लागवट केला जातो. शेतकरी राबराब राबत शेतात काम करतो. मात्र, शेवटी त्यांच्या पदरात निराशाच येत. या वर्षी महापूर, कोरोना या संकटात असताना आता हाता तोंडाशी आलेलं पीक मावा तुडतुडा या रोगामुळे पूर्णतः नष्ट झालं आहे.

खरंतर, शेतकऱ्यांना शेती लागवड करताना पेरणी, रोवणी, खते, बी, बियाणे याला लागणार खर्च एकरी 20 हजार रुपये येतो. मात्र, आता मावा तुडतुडा रोगामुळे धानपिक पूर्णतः नष्ट झालं असून शेतकऱ्यांना धानपिक कापणीलाही परवडत नसल्याने आता शेतकऱ्यांनी उभी पिकं पेटवून दिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकटाचं सावट निर्माण झालं आहे.

शेतीतून असा नफा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून जनावरं पालन करतात. पण शेतीच नाही पैसाच नाही म्हटल्यावर जनावरांना चारा तरी कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

इतर बातम्या – 

कांद्याने वांधा केल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार, मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता
US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(Farmers crops were damaged due to Insects in gondiya)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.