Maharashtra Rain | देवासारखा धावून आलास, शेतकरी चिंतेत असताना महिन्याभरात पावसाची एन्ट्री, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस परतला?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालंय. अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आलेले होते. अखेर शेतकऱ्यांना आज पडलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain | देवासारखा धावून आलास, शेतकरी चिंतेत असताना महिन्याभरात पावसाची एन्ट्री, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस परतला?
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 7:04 PM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सकाळपासून पाऊस पडतोय. तर ठाणे जिल्ह्यात तुफान पाऊस पडतोय. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहारांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. याशिवाय पालघर, रायगड जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडतोय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचं आगमन झालंय. राज्यात कालपासून नेमकं कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलाय याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

वाशिम जिल्ह्यात 15 दिवसांनंतर पाऊस

वाशिम जिल्ह्यात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. त्यामुळे करपत असलेल्या सोयाबीन, तूर, हळद , कपाशी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. मात्र सोयाबीन पीक ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्यामुळे याचा उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

इगतपुरीत पाऊस

इगतपुरी शहरात पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र आता पावसाची संततधार सुरू झालीय. पाऊस असाच सुरू राहिला तर करपण्याच्या मार्गावर असलेल्या भात शेतीस संजीवनी मिळेल. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, असं शेतकऱ्यांचं मत आहे.

हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांनी पावसाचं आगमन

हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाचं आगमन झालंय. जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज सकाळपासूनच रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालीय. मागच्या काही दिवसांत पाऊस झाला नसल्याने पिके सुकत होती. आजच्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र बळीराजा अजूनही जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

धुळे जिल्ह्यात 17 दिवसांनी पाऊस

धुळे जिल्ह्यात तब्बल 17 दिवसांच्य प्रतिक्षेनंतर पावसाचं आगमन झालंय. धुळे शहरासह, साखरी, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसाने सुमारे दीड तास हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी पिकांचं अतोनात नुकसान झालं असलं तरी, आलेला पाऊस हा काहीसा दिलासा देणारा ठरला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हणणं आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मोठ्या खंडानंतर पडलेला हा पाऊस अनेक भागांमध्ये पिकांसाठी वरदान ठरणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. नदी, नाले वाहून निघतील असा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र या चिंतातुर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आजच्या पावसाने केलं असलं तरी मोठ्या पावसाची आशा अद्यापही शेतकऱ्यांना आहे.

बुलढाणा जिल्ह्यात तब्ब्ल 20 दिवसांनी पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात मागील 20 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला तरी पावसाचं आगमन झालं नव्हतं. त्यामुळे शेतातली पीकं सुकून चालली होती. परिणाम उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अशा परिस्थितीत आकाशाकडे पाहून वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांची आता थोडी का होईना चिंता मिटलीय. पिकांना जीवदान मिळाले आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र 20 दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्याने उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना सध्यातरी दमदार पावसाची अपेक्षा आहे.

पालघर जिल्ह्यात महिन्याभराने पाऊस

गेल्या महिनाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्री अचानक हजेरी लावली. रात्री दोन वाजल्यापासून पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीमध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे मोठा दगड गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर आला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

महामार्ग पोलिसांनी दरड कोसळलेल्या बाजूची मार्गिका बंद करून वाहतूक सुरळीत केली. पण दरड कोसळून आलेला मोठा दगड अद्यापही महामार्गावरच असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. महामार्ग पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दगड बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बुलढाण्यात पावसासह धुक्याची चादर

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा कालपासून सुखावला आहे. बुलढाण्यात काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, आज सकाळपासून या पावसामुळे बुलढाण्यात धुक्याची चादर पसरल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. कारण या धुक्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशीवर कीड मोठ्या प्रमाणात पडत असते. याचा परिणाम म्हणजे उत्पन्नात घट होत असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर कीटकनाशके फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.

नांदेड जिल्ह्यात महिन्याभराने पाऊस

तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात आज पावसाने दमदार हजेरी लावलीय. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी, अधिक प्रमाणात पाऊस बरसतोय. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. तसेच सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. सायंकाळी या पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसत आहे. दरम्यान, जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला असून या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

नांदेडमध्ये आज दुपारपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय, आजच्या या सातत्याने बरसणाऱ्या पावसाचा फटका भाजीपाला विक्रेत्याना बसलाय. नांदेड जिल्ह्यातील अनेक आठवडी बाजारात आज भाज्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र पावसामुळे सर्वसामान्यांनी आठवडी बाजाराकडे पाठ फिरवलीय. त्यातून आज भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसतंय.

अमरावतीत जोरदार पावसाची बॅटींग

पावसाने अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं 50 टक्के उत्पादन घटलं आहे. तर आज अमरावतीत जोरदार पावसाने कमबॅक केलं. तासभर पडलेल्या पावसाने काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे. तर शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.