काळजाच तुकडा तो! दुरावेलेल्या बछडयांना ‘ती’ पुन्हा घेऊन गेली, मादी आणि बछडयाच्या व्हिडिओ पाहाच…
नाशिकच्या पाथर्डी परिसरात वनविभागाने बिबट मादी आणि तिच्या बछडयांची बेट घडवून आणण्याचे काम केले असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
नाशिक : आई आणि तीची पिल्लं एकमेकांपासून दुरावली तर तिला किती वेदना होत असतील याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण आईच्या काळजाचाच तो तुकडा असतो. मग ते जीव सृष्टीत कुठल्याही घटकात वेगळं लागू होत नाही. पण असाच एक प्रसंग नाशिकमध्ये समोर आला आहे. पण त्यानंतर आई आणि पिल्ले एकमेकांना भेटल्यानंतरचा प्रसंगही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बिबट आणि मादीचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही असे हे दृश्य आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरात घडलेला हा प्रसंग आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात बिबट मादी आणि तीचे बछडे यांची होत असलेली चुका मुक समोर येत आहे. त्यामुळे मादी बिबटचा जीव अगदी कासावीस होत असल्याचे समोर येत आहे. पाथर्डी परिसरात मागील आठवड्यात बिबट्या दिसल्याने नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर बिबट मादी आणि तिच्या तीन बछडयांची चुकामुक झाली होती.
जेव्हा थंडीत कुडकुडत असलेल्या बछडयांना बिबट मादी घेऊन जाते, व्हिडिओ पाहा… #leopard #nashik #cctvfootage pic.twitter.com/c1nNAu0V7W
हे सुद्धा वाचा— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) December 5, 2022
नाशिकच्या पाथर्डी परिसरात वनविभागाने बिबट मादी आणि तिच्या बछडयांची बेट घडवून आणण्याचे काम केले असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्याला बिबट्यांचे दर्शन काही नविन नाही, मळे परिसरात नेहमीच बिबट्या नागरिकांना दिसून येत असतो. त्यामुळे वणविभागाकडे नहेमी पिंजरा लावण्याची मागणी केली जात असते.
पाथर्डी परिसरात ऊसतोड सुरू असतांना बिबट्याचे तीन पिल्ले ऊसतोड कामगारांना आढळून आली होती, त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही बाब कळवली होती.
शेतकऱ्यांनी ही बाब वन विभागाला कळवली होती, त्यानुसार रेस्क्यू करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून पिल्लांची मादीसोबत भेट घडवून आणली आहे.
वन्यजीव प्रेमींच्या पथकाने माय लेकांची पुनर्भेट घडवून आणण्याचे काम केले असून रात्रीच्या अंधारात हे सगळं घडलं असून मादीच्या कुशीत हे बछडे विसावली होती.