एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार

अखेर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर 3 टक्के केल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन 10 डिसेंबरपर्यंत होणार असल्याचे समजते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के वेतनवाढीचे परिपत्रक काढले; 10 वर्षे सेवा झालेल्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 4:18 PM

मुंबई: अखेर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि वेतनवाढीचा दर 3 टक्के केल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सध्या कामावर हजर असलेले एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन 10 डिसेंबरपर्यंत होणार असल्याचे समजते. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी या वेतनवाढीची घोषणा केली होती. मात्र, राज्यातील अनेक आगारातील एसटी कर्मचारी आणि अधिकारी संपावर ठाम आहेत. त्यातच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार नवनियुक्त आणि 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार आहे. 10 ते 20 वर्षांचे सेवा झालेल्यांचा पगार 4 हजारांनी आणि 20 वर्षांपुढील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार हा फक्त 2500 रुपयांना वाढणार आहे.

8195 कर्मचारी निलंबित पगारवाढीनंतरही गेल्या 22 दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कामगार अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सरकारनेही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 8195 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, 1827 लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातून कर्मचारी आझाद मैदानात आले आहेत. जोपर्यंत विलणीकरण होत नाही तो पर्यंत जाणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. आज मुंबईत पाऊस पडत आहे तरी एसटी कामाचारी निर्णयावर ठाम असून मैदानात ठाण मांडून आहेत. ऊन असो की पाऊस… कितीही मोठे तुफान आले तरी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या विभागात काम बंद

एसटीतील प्रशासकीय विभागात 9 हजार 426 कर्मचारी आहेत. त्यापैकी 9 हजार 53 कर्मचारी कामार आले आहेत. तर 373 कर्मचारी संपात आहेत. कार्यशाळा विभागात एकूण 17 हजार 560 कर्मचारी आहेत. त्यापैकी 5 हजार 488 कर्मचारी कामावर परतले आहेत. तर 12 हजार 72 कर्मचारी संपात आहेत. एसटीत 37 हजार 225 चालक आहेत. त्यापैकी 2 हजार 271 चालक कामावर आले आहेत. तर 34 हजार 954 चालक संपात आहेत. तसेच एसटीत एकूण 28 हजार 55 वाहक असून त्यापैकी 2 हजार 274 वाहक कामावर आले आहेत. तसेच 25 हजार 781 वाहक संपात आहेत.

तोडगा कधी निघणार?

राज्य सरकारने पगारवाढ करूनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आता या प्रश्नी तोडगा कधी आणि कसा निघणार, असा प्रश्न कायम आहे. कारण विलीनीकरणाचा निर्णय इतक्या सहजासहजी शक्य नाही. राज्य सरकारही त्याला तयार नाही. त्यामुळे कोणीतरी माघारीची भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीचा नाशिककरांनी उचलला विडा; केंद्राकडून 1800 कोटी अन् राज्याकडून 400 कोटी मिळवण्याचे प्रयत्न

सुखवार्ताः नाशिक विभागात 9 लाख 77 हजार 400 जण कोरोनामुक्त; मृत्युदर फक्त 2 टक्के

Nashik | कंपन्या, शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी पाणी; कसा अन् कुठे कराल अर्ज, घ्या जाणून

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.