Nashik| भाजपची कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने, मालेगाव दंगलीचा नोंदवला निषेध, रझा अकादमीवर बंदीची मागणी

मालेगाव दंगलीप्रकरणी आतापर्यंत 55 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 18 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Nashik| भाजपची कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने, मालेगाव दंगलीचा नोंदवला निषेध, रझा अकादमीवर बंदीची मागणी
मालेगाव दंगलीचा निषेध करत नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपने निदर्शने केली.
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 1:48 PM

नाशिकः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून राज्यात अमरावती आणि मालेगावमध्ये दंगली पेटल्या. आता त्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषतः या दंगलीमागे कोण, कोणावर कारवाई करावी, याची वक्तव्ये सुरू आहेत. याच्याच पुढचे पाऊल म्हणून भाजप आक्रमक झालेले दिसत आहे. अमरावती आणि मालेगावच्या दंगलीचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सरकारच्या भूमिकेचाही निषेध करण्यात आला. भाजपचे आंदोलन पाहता परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पद्धतशीर कट

मालेगावमध्ये उसळलेला हिंसाचार सुनियोजित असल्याचे समोर आले आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, त्याच्यासारखेच अजून अनेकजण असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे.

55 जणांना अटक

मालेगाव दंगलीप्रकरणी आतापर्यंत 55 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 18 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर पहिल्या गुन्ह्यातील 24 जणांना दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. सीसीटीव्हीचे चित्रण पाहून आरोपींचा शोध सुरू आहे. रझा अकादमीचे अनेक कार्यकर्ते फरार आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. पोलिसांनी मालेगाव दंगलीप्रकरणी रझा अकदमीच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यात महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे समजते. हे पुरावे लवकरच न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

भाजप आक्रमक

मालेगाव आणि अमरावीत दंगलीप्रकरणी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्यातही आरोप-प्रत्यारोप रंगले. मात्र, भाजपने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत आज सोमवारी राज्यभरात ठिकाठिकाणी आंदोलन केले. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मालेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोका, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.

इतर बातम्याः

घरचं झालं थोडं…म्हणे विनाहेल्मेट दुचाकीचालकांची 10 गुणांची परीक्षा; नाशिक पोलिसांचा निर्णय

Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.