संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह टीका अंगलट, गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

गुणरत्न सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला होता.

संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह टीका अंगलट, गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 3:37 PM

नाशिक : अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी सदावर्ते अडचणीत आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली होती. (FIR against Adv Gunaratna Sadavarte in Nashik for criticizing Chhatrapati Sambhajiraje)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी काल एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला होता. सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला. उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारुन निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.

विनायक मेटेंची मागणी काय?

“अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केलं, ते अतिशय खालच्या पातळीचं आहे. मी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. महाराष्ट्र सरकारकडे माझी स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे” अशी मागणी विनायक मेटेंनी केली.

“गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. मी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी करतो” असा संताप विनायक मेटे यांनी व्यक्त केला.

कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?

गुणरत्न सदावर्ते हे व्यवसायाने वकील आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल सदावर्ते यांनी आपल्याला अनेक धमक्‍या मिळाल्याचा आरोप केला आहे.

प्रशिक्षणानंतरही 154 पोलिसांची फौजदारपदी न झालेली नियुक्ती, ज्येष्ठ नागरिक कायदा, ‘मॅट’च्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करणे, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनके केस त्यांनी हाताळलेल्या आहेत. (FIR against Adv Gunaratna Sadavarte in Nashik for criticizing Chhatrapati Sambhajiraje)

संबंधित बातम्या :

छत्रपतींच्या घराण्याचा अपमान, गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलीची सनद रद्द करा, विनायक मेटे आक्रमक

एक राजा बिनडोक, तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर, प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात

संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, समर्थकांच्या गोंधळाचा निषेध : गुणरत्न सदावर्ते

(FIR against Adv Gunaratna Sadavarte in Nashik for criticizing Chhatrapati Sambhajiraje)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.