Sheikh Hussain: मोदींविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर, काँग्रेस नेते हुसेन यांच्याविरोधात नागपुरात गुन्हा दाखल
दरम्यान हुसैन यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना, पंतप्रधान मोदींविरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात अपमानास्पद आणि अपशब्द वापरल्याप्रकरणी महाराष्ट्रातील एका काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नागपुरात दाखल करण्यात आला असून काँग्रेसचे नेते शेख हुसेन (Congress leader Sheikh Hussain) असे त्यांचे नाव आहे. त्यामुळे शेख हुसेन हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कलम 294, 504 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शेख हुसेन यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यानरून देशातील विविध भागात काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. त्यावरून नागपूरमध्येही आंदोलन केले. नागपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त विधान केले. त्याविरोधात भाजपाने तक्रार दाखल केली आहे.
FIR registered against Maharashtra Congress leader Sheikh Hussain at Gittikhadan PS in Nagpur for using derogatory language against PM Modi. FIR registered last night u/s 294 (obscene acts and songs) and 504 IPC (intentional insult with intent to provoke breach of the peace).
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 15, 2022
नागपुरातील गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल
राहुल गांधी यांची ईडीने केलेल्या चौकशीच्या विरोधात नागपुरातील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा हुसेन यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरला होता. त्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर नागपुरातील गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री हुसेन विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 294 (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि 504 आयपीसी (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच हुसेन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. हुसेन यांना 24 तासांत अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ही भाजपकडून देण्यात आला आहे.
मोदींविरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नाही
दरम्यान हुसैन यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना, पंतप्रधान मोदींविरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नागपूर पोलिसांनी राज्यमंत्री नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.