Kolhapur Fire : गोकुळ शिरगाव एमआयडीसीत हाहाकार, केमिकल कंपनीला भीषण आग
कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत (Gukul Shirgaon MIDC) एका केमिकल कंपनीला भीषण आग (Kolhapur Fire) लागलीय. या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
भूषण पाटील, Tv9 मराठी, कोल्हापूर : कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत (Gukul Shirgaon MIDC) एका केमिकल कंपनीला भीषण आग (Kolhapur Fire) लागलीय. या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. आग इतकी भीषण आहे की, संपूर्ण कंपनीला या आगीने गिळंकृत केल्याचं दृश्य आहे. आख्या कंपनीत ही आग पसरली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ्याते लोट पसरले आहेत. याशिवाय कंपनीतून काही वेळाच्या अंतराने स्फोटाचे आवाज येत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झालीय. आगीच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
गोकुळ शिरगाव एमआयडीसीत शेरा प्लस ही केमिकल कंपनी आहे. याच केमिकल कंपनीला ही आग लागली आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आगीची माहिती मिळताच महापालिका आणि इतर यंत्रणाचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण आगीमुळे धुळाचे लोट परिसरात पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग आटोक्यात येताना दिसत नाहीय. याउलट आगीचा भडका वाढताना दिसतोय. त्यामुळे आजूबाजूच्या देखील कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत.
एकीकडे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांची मोठी फौज दाखल झालीय. पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जातेय.
कंपनीत आग नेमकी का लागली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. आगीच्यावेळी कंपनीत किती कर्मचारी होते, त्यांची सुखरुप सुटका झालीय का, आतमध्ये कुणी अडकलेलं तर नाही ना, याचा तपास प्रशासनाकडून घेतला जातोय. पोलीस, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व काळजी घेतली जातेय.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच पाच ते दहा मिनिटात कोल्हापूर महापालिका, कागल महापालिकेच्या चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न करण्यात आले. पण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही.
आगीचे आणखी बंब घटनास्थळी आणण्यात आले आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण आग विझण्याच्या ऐवजी मोठा भडका उडताना दिसतोय. आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.