Maratha Reservastion | मराठा आंदोलनाच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
Maratha Reservastion | कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यात सगेसोयरे शब्दावरुन सगळ अडलं होतं. अखेर सरकारने अध्यक्षादेश काढून सेगसोयर शब्दाचा समावेश करण्याच मान्य केलं आहे.
Maratha Reservation | “सगळा विजय मराठा समाजाचा आहे. अध्यादेश निघणं ही साधी-सोपी गोष्ट नव्हती. मराठा समाज मुंबईकडे निघाला, तसा अध्यादेश निघाला. सगेसोयरे शब्द, केसेस मागे घेण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मराठवाड्यासाठी गॅजेट निघणार. असे सात-आठ शासन निर्णय त्यांनी केलेत. हा विजय सगळा मराठा समाजाचा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यासाठी आज पहाटे अध्यादेश काढला. कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यात सगेसोयरे शब्दावरुन सगळ अडलं होतं. अखेर सरकारने अध्यक्षादेश काढून सेगसोयर शब्दाचा समावेश करण्याच मान्य केलं आहे.
“मी संघर्ष केला. माझ्या समाजाने खूप संघर्ष केला. आरक्षणासाठी शेवटी आम्हाला मुंबईकडे याव लागलं. मराठ्यांच्या ताकदीमुळे हा अध्यादेश निघाला. कारण जवळजाऊन ही अध्यादेश निघत नव्हता. कारण यांना अध्यादेश काढायचा नव्हता. चारही बाजूंनी मराठे मुंबईत घुसू लागले आहे. आता हे थांबणार नाही हे लक्षात आलं, त्यानंतर अध्यादेश निघाला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
यापुढे मनोज जरांगे पाटील यांची लढाई कशासाठी असेल?
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते जीआर घेणार’ असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. “हा आनंद मराठा समाजाला खूप दिवसांनी मिळाला. मी पुढही लढत राहणार आहे, आरक्षण मिळवताना लोकांना अडचणी आल्या, नोंदी, नातेवाईकांना प्रमाणपत्र देताना अडचणी आल्या तर त्यासाठी लढत राहू” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विजयी सभा कुठे घेणार
“विजयी सभा कुठे घेणार? हा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, मी विजयी सभा कुठे घेणार? हा निर्णय इथूनच जाहीर करणार होतो. पण आता अंतरवली सराटीला जाईन, तिथे समाजाच्या लोकांशी बोलून निर्णय घेईन” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सगेसोयरे हा शब्द म्हणजे सातबारा
आंदोलन संपणार नाही, सध्या ते स्थगित करतोय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा समाजाने दिवाळी साजरी करावी, यापेक्षा आनंद काय? सगेसोयरे शब्द घेणं सोप नव्हतं. त्यासाठी राजपत्र काढण्यात आलय. मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय आहे. शेतीसाठी जसा सातबारा असतो, म्हणजे जमीन तुमच्या हक्काची तसच या मराठा आरक्षणात सगेसोयरे हा शब्द सातबारा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.