पाच हत्तींचा कळप मुख्य रस्त्यावर; दोन हत्तींबरोबर तीन पिल्लांचा समावेश, सिंधुदुर्गातील घटना

दोन मोठे हत्ती तर तीन लहान पिल्ले असल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरुन ही पाच हत्ती जात असतानाचा व्हिडिओ मिळाला असून हत्तींच्या मागे वाहन असूनही देखील रस्त्यावरील हत्ती निवांत पणे चालताना दिसून आले. हत्ती रस्त्यावरुन चालत असताना दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाच हत्तींचा कळप मुख्य रस्त्यावर; दोन हत्तींबरोबर तीन पिल्लांचा समावेश, सिंधुदुर्गातील घटना
दोडामार्ग तालुक्यात रस्त्यावर वावरत असलेले हत्तीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 6:42 PM

सिंधुदुर्गः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील केंचेवाडी गावात हत्ती घुसल्याची घटना ताजी असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यावर हत्तींचा कळप वावरत असल्याचे दिसून आले. दोडामार्ग-बेळगाव-कोल्हापूर मार्गावर (Dodamarg-Belgaum Road) पाच हत्तींचा कळप दिसून आला. दोन मोठे हत्ती तर तीन लहान पिल्ले असल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरुन ही पाच हत्ती (Five Elephant) जात असतानाचा व्हिडिओ मिळाला असून हत्तींच्या मागे वाहन असूनही देखील रस्त्यावरील हत्ती निवांत पणे चालताना दिसून आले. हत्ती रस्त्यावरुन चालत असताना दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुगीच्या दिवसात हत्तींचे कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg) दोडामार्ग तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात येत असतात. या दोन्ही तालुक्यात हत्तींचा वावर वाढला असल्याने याचा फटका शेतकऱ्यांनाही दरवर्षी बसतो. दोडामार्गातू चंदगड तालुक्यात येणारे हत्ती मार्गक्रमण करत चंदगड, आजरा आणि अगदी राधानगरी तालुक्यातही वावरताना दिसून येतात. सुगीच्या दिवसात दिसून येणार हत्ती आता मार्च महिन्यानंतर दिसू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हत्ती रस्त्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील हेवाळ, बांबर्डे घाटीवडे येथे हत्तींचा कळप रस्त्यावर दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा कळप मुख्य रस्त्यावर दिसून येत असल्याने वाहनचालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर हत्ती दिसून येत असल्याने अनेकांनी आता रात्रीचे प्रवास करणे टाळले आहे.

शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती

दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या कळपाचा जो व्हिडिओ करण्यात आला आहे, त्यामध्ये दोन मोठे हत्ती, तीन लहान पिल्लांसोबत रस्स्त्यावर आढळून आले आहेत. दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर हेवाळे, बांबर्डे-घाटीवडेजवळ हत्तींचा कळप दिसून आल्याने आता शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या

Nagpur Dogs | रामटेकमध्ये कुत्र्यांचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

बिबट्याला ठोसे लगावून पत्नीने वाचविला पतीचा जीव; दरोडी-चपळदरा भागातील घटना

‘तुकड्यावर जगणारांनी शहाणपणा शिकवू नये’, सदाभाऊंचा मिटकरींवर पलटवार; पवारांवरील टीकेवरुन दोघांत जुंपली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.