भाजपला सोडचिठ्ठी देत माजी नगरसेविकेचे ठाकरेंच्या उपस्थित शिवबंधन, मातोश्रीवर “असा” झाला पक्षप्रवेश…
नुकतेच हाती शिवबंधन बांधलेल्या पूनम धनगर या नाशिकच्या पंचवटीतील प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेविका होत्या.
नाशिक : नाशिकमधील माजी नगरसेविका यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले आहे. माजी नगरसेविका पूनम धनगर यांनी आज भाजपाला रामराम ठोकत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर (Matoshri) प्रवेश केला आहे. शिवसेना (shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर यांनी याबाबत पुढाकार घेत पूनम धनगर यांच्या हाती शिवबंधन बांधले आहे. यावेळी पूनम धनगर यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. मुंबईत मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा पार पडला. पंचवटीमधून पूनम धनगर या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
नुकतेच हाती शिवबंधन बांधलेल्या पूनम धनगर या नाशिकच्या पंचवटीतील प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेविका होत्या.
माजी महापौर रंजना भानसी आणि अरुण पवार यांच्या पॅनलमध्ये आरक्षित असलेल्या जागेववर पूनम धनगर निवडणूक लढल्या होत्या आणि त्या विजयी झाल्या होत्या.
प्रभाग एकवर नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिले असून माजी खासदार यांच्या कन्या आणि माजी महापौर रंजना भानसी यांचे येथे वर्चस्व आहे.
पूनम धनगर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असला तरी पूनम यांना माजी महापौर रंजना भानसी यांच्याशी निवडणुकीत दोन हात करावे लागणार आहे.
पूनम धनगर यांचे तिकीट यंदाच्या निवडणुकीत कापले जाणार अशीही चर्चा असल्याने पूनम धनगर या भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा होती.
भाजपमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप नाराज झालेले असतांना महापौर निवडणुकीत 12 भाजपचे नगरसेवक सानप यांच्या बरोबर होते. त्यात धनगर यांचा समावेश होता.
पूनम धनगर यांचा शिवसेना प्रवेश सुखकर झाला असला तरी आता त्यांना पालिका निवडणुकीत मोठी लढाई लढावी लागणार आहे.
त्यातच शिवसेना भाजप मधील असलेला टोकाचा संघर्ष देखील स्थानिक पातळीवरील नेत्यांशी लढावा लागणार असून स्वतःचा राजकीय मार्ग देखील निर्माण करावा लागणार आहे.