Nashik | येवल्याच्या माजी नगराध्यक्षा, जेष्ठ समाजसेविका सुंदराताई लोणारी यांचे निधन

येवल्याच्या माजी नगराध्यक्षा आणि ज्येष्ठ समाजसेविका सुंदराताई लोणारी यांचे निधन झाले आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषविताना सुंदराताई यांनी आपल्या कार्याचा शहरात ठसा उमटवला होता.

Nashik | येवल्याच्या माजी नगराध्यक्षा, जेष्ठ समाजसेविका सुंदराताई लोणारी यांचे निधन
सुंदराताई लोणारी.
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 6:27 PM

नाशिकः येवल्याच्या माजी नगराध्यक्षा आणि ज्येष्ठ समाजसेविका सुंदराताई लोणारी यांचे निधन झाले आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषविताना सुंदराताई यांनी आपल्या कार्याचा शहरात ठसा उमटवला होता. विशेष म्हणजे त्या समाजकार्यातही अग्रेसर होत्या. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग

सुंदराताई लोणारी यांनी सन 1996 साली त्यांनी येवला शहराचे नगराध्यक्षपद भूषविले होते. नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवितांना आपल्या कार्याचा ठसा येवला शहरात उमटविला. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विकासकामे मार्गी लावली. सामाजिक कार्यातही त्या सक्रियपणे सहभाग घेत. त्यांनी येवला नगरपालिकेच्या रुग्णालयात देखील सेवा बजावली.

अनेक पुरस्काराने गौरव

नगरपालिका रुग्णालयातील त्यांचे कार्य देखील उल्लेखनीय ठरले. नगरपालिका रुग्णालयात कार्यरत असताना त्यांनी कुटुंब कल्याण कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांना राज्य शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने, याशिवाय जिल्हा परिषद व येवला नगरपालिकेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ आणि अनुभवी लोकप्रतिनिधीस येवलेकर कायमचे मुकले आहेत.

पालकमंत्र्यांची श्रद्धांजली

सुंदराताई लोणारी यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सुंदराताई लोणारी यांची निधनवार्ता अतिशय वेदनादायी आहे. या बातमीने अतिशय दुःख झाले. मी व माझे कुटुंबीय लोणारी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो,हीच प्रार्थना करतो. दरम्यान, सुंदराताई लोणारी यांना शिक्षण, समाज, राजकारण या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

इतर बातम्याः

Omicron जनजागृती; ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षांची चक्क नाशिक ते शिर्डी 90 किमीची धाव, 6 वर्षांपासून उपक्रम

Kashi Vishwanath Corridor: हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है; ज्या भाषेतून मोदी बोलले ती बोली माहीत आहे का?

Obc आरक्षणाच्या याचिकेवर होणारी सुनावणी उद्यावर, इतर राज्यांची परिस्थिती आपल्यासारखीच-भुजबळ

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.