‘मेळाव्याला बोलावलं नाही तर श्रोत्यांमध्ये बसणार,’ जानकर म्हणतात भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी
रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्या मागेपुढे कोणी असो वा नसो, भाऊ म्हणून मी पाठीशी कायम उभा राहणार आहे. त्यांन मला मेळाव्याला बोलावलं नाही तरी मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल. पण मेळाव्याला येणारच असे वक्तव्य केले आहे.
मुंबई : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची मागील कित्येक दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्या मागेपुढे कोणी असो वा नसो, भाऊ म्हणून मी पाठीशी कायम उभा राहणार आहे. त्यांनी मला मेळाव्याला बोलावलं नाही तरी मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल. पण मेळाव्याला येणारच असे वक्तव्य केले आहे.
भाऊ म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहणार
“पंकजा मुंडे या भगवान गडावरील मेळाव्याच्या क्रियेटर आहेत. पंकजा मुंडे यांच्या मागे कुणी असो अथवा नसो, मी भाऊ म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे. पंकजा मुंडे यांनी बोलावलं नाही तर मी मेळाव्याला येणार. ऑडिशनममध्ये बसेल पण दसरा मेळाव्याला मी जाणार आहे,” असे महादेव जानकर म्हणाले.
बहीण एखाद्या ठिकाणी अस्वस्थ असेल तर भावाला बोलून दाखवते
पंकजा मुंडे राज्यातील नेतृत्व तसेच इतर कारणांमुळे नाराज असल्याचं नेहमी बोललं जातं. यावरदेखील त्यांनी भाष्य केलं. “बहीण एखाद्या ठिकाणी अस्वस्थ असेल तर ती भावाला बोलून दाखवते. पण पंकजा ताईंनी मला असं काही बोलून दाखवलं नाही. त्यामुळे नाराज आहेत असं मला वाटत नाही,” असं जानकर म्हणाले.
यावेळी मेळाव्याला विशेष अतिथी नाही
दरम्यान, आज दसऱ्यानिमित्त पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीडमधील भगवान गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे मोठ्या जोशात नियोजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून मुंडे यांनी जनतेने मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केलेले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी यावेळी दसरा मेळाव्याला कोणालाही विषेश अतिथी म्हणून बोलावलेले नाही. मागील वर्षी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रण दिलं होतं. यावेळी मात्र पंकजा मुंडे याच मुख्य अतिथी असतील.
इतर बातम्या :
Video: बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या हवाल्यानं गुलाबराव पाटलांकडून ‘राड्या’ची फोड
आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत
VIDEO | मतांचं इतकं ओझं टाकलं की मला आडवंच व्हायची वेळ, सोमेश्वर कारखान्याच्या विजयावर अजित पवारांचं भाष्य https://t.co/UWjwnOHUKC @AjitPawarSpeaks | @NCPspeaks | #AjitPawar | #Someshwar
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021
(former minister mahadev jankar said will always support to pankaja munde)