संतापजनक ! थकीत पैसे मागायला जाताच माजी मंत्री भडकले, शेतकऱ्याला थेट शिवी हासडली
थकीत ऊसबिलाची रक्कम मागायला आलेल्या शेतकऱ्यांना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी थेट शिवी दिल्याची संतापजनक घटना घडली. शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना मध्येच एक शेतकरी बोलल्यामुळे म्हेत्रे यांना राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्याला थेट शिवी हासडली आहे. या संपूर्ण घटनेचा कथित व्हिडीओ समोर आला आहे.
सोलापूर : थकीत ऊसबिलाची रक्कम मागायला आलेल्या शेतकऱ्यांना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी थेट शिवी दिल्याची संतापजनक घटना घडली. शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना मध्येच एक शेतकरी बोलल्यामुळे म्हेत्रे यांना राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्याला थेट शिवी हासडली आहे. या संपूर्ण घटनेचा कथित व्हिडीओ समोर आला आहे.
नेमका प्रकार काय आहे ?
मातोश्री साखर कारखान्याचा कारभार म्हेत्रे यांच्याकडे आहे. या कारखन्याला उस विकणाऱ्या शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे ऊस बील थकीत आहे. हेच थकीत बील मिळावे म्हणून मागील 11 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तब्बल अकरा दिवसापासून आंदोलन सुरु असल्यामुळे चर्चा करण्यासाठी काही शेतकरी आज अक्कलकोट येथे म्हेत्रे यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी बोलत असताना म्हेत्रे यांना राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्याला शिवी दिली.
पाहा व्हिडीओ :
सिद्धाराम म्हेत्रे नेमकं काय म्हणाले ?
सगळे शांत बसा. मी बोलत असताना मध्ये-मध्ये बोलून कोणाला तरी पुढारीपण करायचा असेल तर आताच कारखान्याला आग लावतो. तितका मी कडू आहे. या कारखान्यावर माझं पोट भरत नाही. पाच वर्षे…. (यावेळी म्हेत्रे वाक्य पूर्ण करण्याआधी मध्येच एक शेतकरी ओरडला.) त्यानंतर म्हेत्रे यांना राग अनावर झाला. तेव्हा त्यांनी ‘ये xx’ असे म्हणत थेट शेतकऱ्याला शिवी दिली. दरम्यान या घटनेचा कथित व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला जातोय.
कोण आहेत सिद्धाराम म्हेत्रे?
सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे.
सिद्धाराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत
सोलापूरच्या राजकारणात सिद्धाराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे.
इतर बातम्या :
आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा
येत्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार; हवामान विभागाकडून 10 जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी
(former minister siddharam mhetre used abusive word to farmer video went viral on social media)